Breaking News

Monthly Archives: November 2021

तुळशी विवाहासाठीची साहित्य खरेदी सुरू

उरण : वार्ताहर कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक सण साजरे झाले नाहीत. अनेक विवाहसुद्धा पुढे ढकलण्यात आले, मात्र आता स्थिती स्थिर असल्याने या वर्षी लग्न सोहळे जोरदार सुरू होतील. उरण बाजारपेठेत तुळशी विवाहासाठी लागणार्‍या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सुरुवात झाल्यावर लग्न सोहळे सुरू होतात. तुळशी विवाहासाठी प्रामुख्याने …

Read More »

गोरगरीब मुलांसोेबत ‘दिशा’चा बालदिन

पनवेल : रामप्रहर वृत्त बालदिनानिमित्त दिशा महिला व्यासपीठाने ओपन एज्युकेशनमधील मुलांसाठी बालमहोत्सव आसुडगाव येथे सोमवारी (दि. 15) आयोजित केला होता. यानिमित्त डोंबार्‍याचा खेळ करून पोटाची खळगी भरणार्‍या मुलांसाठी डॉ. कोलते व अनिता कोलते यांनी ब्रिजखाली सुरू केलेल्या शाळेत शिकणार्‍या मुलांसाठी हा दिवस आनंदात, उत्साहात जावा यासाठी आयोजन केले होते. चपलेऐवजी …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे हृदयतपासणी शिबिर

खारघर : प्रतिनिधी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे टुडी इको शिबिर झाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व श्री सत्यसाई संजीवनी सेंटर चाईल्ड हार्टकेअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक स्किल्स, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) हे शिबिर झाले. 14 वर्षे वयोगटातील मुलांची या वेळी हृदयतपासणी करण्यात आली. जन्मजात मुलांमध्ये हृदयविकाराचे …

Read More »

नवी मुंबईत बालदिनी स्वच्छ चित्रकला स्पर्धा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बालदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ चित्रकला स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम 2997 विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी …

Read More »

राष्ट्र सेवा दलाच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्र सेवा दल संघटनेच्या रायगड जिल्हा शाखा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत 12 ते 18 वर्षे वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे सात दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप रविवारी (दि. 14) बालदिनी करण्यात …

Read More »

के. गो. लिमये वाचनालयात पंडित नेहरूंची जयंती आणि बालदिन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या संस्थेच्या वतीने बालदिनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी पं. …

Read More »

खारघरमध्ये एकदिवसीय मतदार नोंदणी शिबिराला प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणूक विभाग प्रभाग क्रमांक अ खारघरमध्ये विविध ठिकाणी रविवारी (दि. 14) स्वीप 2021 अंतर्गत सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत एकदिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 205 अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली. खारघरमधील सेक्टर 35 हाईड पार्क येथे 65 अर्जांची, अरिहंत अनन्य येथे 38 …

Read More »

कुंडेवहाळमध्ये विकास कामाचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त कुंडेवहाळ येथे सिडकोमार्फत मंजुर केलेल्या गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) झाले. तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या आणि पाठपुराव्याच्या आधारे, जसे आज एक काम सुुरू झाले आहे. अशीच …

Read More »

दीपक मोकल यांना राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्कार प्रदान

रेवदंडा : प्रतिनिधीयेथील क्रीडाशिक्षक दीपक मोकल यांना नुकतेच राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय खेळ विकास परिषदेच्या वतीने देण्यात येत असलेला हा पुरस्कार नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल …

Read More »

अलिबागमध्येही आरपीएल; स्पर्धेचे शानदार उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील शिरढोण येथील रायगड प्रीमियर लीग (आरपीएल) संपते न् संपते तोच आणखी एक आरपीएल सुरू झाली आहे. या 25 वर्षांखालील मुलांसाठीच्या टी-20 क्रिकेट स्पर्धचे अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील क्षत्रीय माळी समाजाच्या हॉलमध्ये उत्साहात उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे …

Read More »