पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात सर्वत्र सरपटणारे जीव मोठ्या प्रमाणावर दिसून आले, पावसाळा नुकताच संपला आहे. या हंगामात साप, सरडे इत्यादी सरपटणारे प्राणी भक्ष्य व उष्णतेसाठी रस्त्यावर बाहेर फिरतात. खाद्य गोळा करण्यासाठी त्यांच्या हालचाली वाढत आहेत. मग बर्याच वेळा हे प्राणी रस्त्यावर येऊन वाहनांखाली चिरडून त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. …
Read More »Monthly Archives: November 2021
मूर्तिकारांची कला अप्रतिम
नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचे गौरवोद्गार पेण : प्रतिनिधी गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात श्री गणेश मित्र मंडळ कुंभार आळी आणि येथील गणपती कारखानदारांनी राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कलाकारांना प्रोत्साहन देताना नगराध्यक्षा …
Read More »ग्रामीण भागात रास्तधान्य सहज मिळण्याचा मार्ग मोकळा
रायगड जिल्ह्यात 252 नवीन दुकानांसाठी जाहीरनामे अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी नवीन 252 रेशन दुकाने सुरू करण्यासाठी जाहीरनामे काढले आहेत. यात शहरी भागातील 23; तर ग्रामीण भागातील 229 दुकानांचा समावेश आहे. नवीन दुकानांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत संस्थांना अर्ज करता येतील. जिल्ह्यात दोन हजार महसुली गावे आहेत. त्यात चार …
Read More »पं. नेहरू जयंती, बालदिन जासई हायस्कूलमध्ये उत्साहात
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच भारतीय मजदूर संघाचे …
Read More »पालीकरांवर अघोषित पाणीटंचाईचे संकट
अंबा नदीच्या पाणी पातळीत घट पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत वर्षानुवर्षे पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पालीकरांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. पावसाळा संपल्यावर येथून काही अंतरावर असलेल्या बलाप गावाजवळील अंबा नदीच्या के.टी. बंधार्याचे दरवाजे, फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी अडविले जाते, …
Read More »भाजपकडून पाले येथील शाळेला इन्व्हर्टर
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण पूर्व विभागातर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या पाले येथील शाळेला इन्व्हर्टर प्रदान करण्यात आले. उरण तालुका महिला अध्यक्ष राणी सुरज म्हात्रे, पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद, पाले शाळेला इन्व्हर्टर देण्यात आले. या वेळी …
Read More »दक्षिण आफ्रिकेतील आंबा नवी मुंबई एपीएमसीत दाखल
दर 1200 रुपये किलो, चव हापूससारखीच नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेल्या या आंब्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी आवक झाली. पहिल्या दिवशी 230 बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये …
Read More »‘रोटरी’तर्फे डायबिटीज डे साजरा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक डायबिटीज डेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या वतीने शनिवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 वाजता येथील फ्लाइट लेफ्टनंट तुषार चव्हाण गार्डनमध्ये डायबिटीज डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पनवेलच्या प्रसिद्ध डायबिटीज स्पेशालिस्ट डॉ. किर्ती समुद्रा यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुमूल्य व सखोल असे मार्गदर्शन …
Read More »नवी मुंबईत वस्ताद लहुजी साळवे यांचा जयंती उत्सव
नवी मुंबई : प्रतिनिधी वस्ताद लहुजी साळवे यांची 227वी जयंती वाशी येथील असंघटित नाका कामगारांनी साजरी केली. प्रारंभी, वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या वेळी कामगारांना मार्गदर्शन करताना वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेल्या कार्याची महती सांगण्यात आली. विजय गायकवाड, …
Read More »‘होपमिरर’तर्फे गरजूंना ब्लँकेट्स वाटप
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त हिवाळा ऋतू जवळ येत आहे. त्यात गरजु व वंचित मुलांना थंडीचा सामना करण्यासाठी नवी-मुंबईमधील होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्लँकेट्स वाटप उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पनवेल, नवी मुंबई नजीकच्या रस्त्याच्या कडेला व फुटपाथवरील 100 गरजवंताना ब्लँकेट्सचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे. स्वेटर वितरणानंतर त्याच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper