पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 10) झाली. या निवडणुकीत भाजपचे महेंद्र गोजे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचीत उपसपरंच महेंद्र गोजे यांचे अभिनंदन केले. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर महेंद्र गोजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »Monthly Archives: November 2021
पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी भाजपच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण आदींसह घाटमाथा, कोकणात जाणार्या प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. अनेक वेळा गर्दीचा …
Read More »हायड्रोजन बॉम्ब सोडा, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज!; भाजप नेते आशीष शेलार यांचा जोरदार पलटवार
मुंबई : प्रतिनिधी हायड्रोजन बॉम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या बिर्याणीसारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …
Read More »सुधागडात आरोग्यदायी कंदमुळांचे भरघोस उत्पादन
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. आदिवासी बांधव तालुक्यातील विविध ठिकाणी कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री करताना दिसत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी मिळत असला तरी यातून आदिवासींना चांगला रोजगार मिळत आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांशी …
Read More »कर्जतमध्ये बालोत्सवाचा शुभारंभ
चिमुरड्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नांगुर्ले येथे शिबिर कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील बालकलाकारांना हक्काचं व्यासपीठ देणार्या उत्कर्ष इव्हेंट्स आयोजित बालोत्सव 2021 चा मंगळवारी (दि. 9) शुभारंभ करण्यात आला. हा बालोत्सव चार दिवस चालणार असून, त्याला चिमुरड्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बालोत्सवानिमित्ताने कर्जत तालुक्यातील नांगुर्ले येथील जुरासिक फार्ममध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन …
Read More »माणगाव शहरात चोरी; पाच लाखांचे दागिने घेऊन चोरटे पसार
माणगाव : प्रतिनिधी शहरातील इशरत प्लाझा बिल्डींगमधील एका घरातील पाच लाख 20 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी घडली. विजय दत्तू सत्वे (वय 49, रा. इशरत प्लाझा, बी विंग, रूम नं. 411, कचेरी रोड, माणगाव) यांच्या उघड्या दरवाजातून मंगळवारी …
Read More »रस्त्याअभावी गरोदर आदिवासी महिलेची परवड
आसलवाडीतील बेबी दरवडा यांचा डोलीतून प्रवास कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे आसलवाडीमधील एका गरोदर महिलेला बुधवारी (दि. 10) डोली करून जुम्मापट्टीपर्यंत न्यावे लागले. माथेरानच्या पायथ्याशी 12 आदिवासी वाड्या असून त्या वन जमिनीवर वसल्या आहेत. या वाड्यांपर्यंत …
Read More »तरूणांनो निर्व्यसनी राहा!
हिंदुस्तानी तरुणांनो निर्व्यसनी रहा, राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन उत्तराखंडमधील 14,500 फुट उंचीच्या पानगरचुला शिखरावरून पनवेल येथील गिर्यारोहक प्रा. विक्रांत घरत यांनी केले आहे. प्रा. विक्रांत घरत यांनी – 3 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असणारे पानगरचुला हे शिखर नऊ ऐवजी चार दिवसात सर केले आहे. पिल्लेज व्यवस्थापन …
Read More »माथेरान शटलसेवेत वाढ
माथेरान : प्रतिनिधी मध्य रेल्वेने माथेरान ते अमनलॉज या शटलसेवेच्या फेर्यांत वाढ केली आहे. माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस अनेक प्रवाशांना माथेरान ते अमनलॉज शटलसेवेचे तिकीट उपलब्ध होत नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारपासून शटलसेवेच्या फेर्यांत वाढ केली आहे. त्यामुळे …
Read More »हा एसटीची मालमत्ता हडप करण्याचा डाव
अॅड. महेश मोहिते यांचा ठाकरे सरकारवर आरोप; संपकर्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करणार पेण : प्रतिनिधी महामंडळास डबघाईस आणून एसटीची कोट्यावधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असून, त्यासाठी कर्मचार्यांना वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे गरीब एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper