Breaking News

Monthly Archives: November 2021

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल; दिवाळीच्या आनंदाबरोबरच पर्यटक घेताहेत मोकळा श्वास

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाची साडेसाती संपली नसली तरी त्याचा प्रभाव खूपच कमी झाला आहे. त्यामुळे आता पर्यटक घराबाहेर पडले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी रायगडच्या किनार्‍यांची निवड केली आहे. त्यामुळे रायगडातील सर्वच किनारे आता गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बागा यामुळे रायगडचे …

Read More »

भारतीय नौकेवर पाकिस्तानचा गोळीबार; पालघरमधील मच्छीमाराचा मृत्यू

पालघर : प्रतिनिधी गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणार्‍या भारतीय नौकेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे, तर गुजरातमधील एका मच्छीमाराला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. गुजरात राज्याच्या ओखा बंदरातील …

Read More »

राज्यात वादळी वारे घोंगावणार, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये

मुंबई : प्रतिनिधी श्रीलंका आणि तमीळनाडू किनार्‍यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या काही प्रदेशात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून …

Read More »

न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचे आव्हान संपुष्टात

आबूधाबी : वृत्तसंस्थाट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ निश्चित झाला आहे. अफगाणिस्तानवर मात करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडच्या या विजयासह भारताचे ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान देखील आता संपुष्टात आले आहे. अबूधाबीच्या स्टेडियमवर झालेल्या रविवारच्या (दि. 7) सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह …

Read More »

दिघोड्यात रांगोळी, गडकिल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण

उरण : रामप्रहर वृत्त मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा या करिता जय मातादी ग्रुप दिघोडे तर्फे दिघोडे वासियांकरिता रांगोळी व गड किल्ले स्पर्धेचे आयोजन मयूर घरत व निलेश पाटील यांनी केले होते. नुकताच या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन करण्यात आला. या मध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 5555 …

Read More »

शिंपी समाजाकडून आदिवासींना दिवाळी फराळ

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील शिंपी समाज बांधवांतर्फे अलिबाग येथील बेलोशी-परळ वाडी येथील आदिवासी वाडीतील घराघरात जाऊन आदिवासी समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेलचे संदीप शिंत्रे, मनीषा शिंत्रे, योगिता मांढरे, सुनील पोरे आणि एडवोकेट नागेश हिरवे हे उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केल्यानंतर शिंपी समाज …

Read More »

किल्ले बनविण्यासाठी मुलांना प्रोत्साहन

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील सेक्टर 34 मधील शिवकृपा सोसायटीच्या आवारात बाल मावळ्यांनी दिवाळीनिमित्त किल्ला निर्माण केला आहे. शिवकृपा सोसायटीचे शेखर जगताप, सुधीर काठमोरे, सुनील राळे, मिलिंद पारकर आणि इतर सर्व रहिवाशांनी या बाल मावळ्यांना प्रोत्साहन दिले. दसर्‍यानंतर सर्वांनाच दिवाळीची उत्सुकता लागते आणि त्याच वेळेस शाळकरी मुलांना किल्ले बनवण्याचे …

Read More »

दुर्गम भागात दिवाळीनिमित्त फराळ आणि फटाक्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचे संकट पूर्णपणे अजून गेले नसले तरी नियमांचे पालन करून नागरिकांनी यावर्षी दिवाळी साजरी केली. अनेक ठिकाणी दिवाळी जल्लोषात साजरी होत असली तरी पनवेलमधील काही दुर्गम भागात दिवाळी साजरी करता आली नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गरिबांचीदेखील दिवाळी साजरी व्हावी. या उद्देशाने पत्रकार मित्र असोसिएशनचे …

Read More »

‘नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी पनवेल महापालिका कटिबद्ध’

कळंबोली : बातमीदार कोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकाच्या प्रशासनाने व कर्मचारी वर्गाने मोठे योगदान देऊन उल्लेखनीय काम केले आहे. पनवेल महापालिका नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषद व्यक्त केला. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक …

Read More »

वाहनचोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीला अटक; 20 कार जप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्या होत्या. जुलै महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी वाहनचोरी करणार्‍या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात अधिक तपास करून …

Read More »