Breaking News

Monthly Archives: November 2021

अवकाळी पावसाचा तडाखा; भातपिकांचे अतोनात नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी मागील दोन पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाले. उभी पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. हाती आलेले भातपीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवार संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने भातपिकाची पुरती वाताहत झाली असून शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे …

Read More »

केंद्राच्या घोषणेनंतर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 8.7 आणि 9.52 रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून ती गुरुवार (दि. 4)पासून लागू करण्यात आली आहे. ज्या …

Read More »

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस; बळीराजा हवालदिल

पाली, मुरूड ः प्रतिनिधीसर्व जण दिवाळीचा उत्सव हर्षोल्हासात साजरा करीत असताना रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर पीक भिजल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.दीपावली पाडव्याच्या दिवशी वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार …

Read More »

पनवेलच्या ‘दिवाळी पहाट’मध्ये सप्तसुरांची उधळण

स्वरसम्राट राहुल देशपाडेंच्या सुरेल मैफिलने रसिक मंत्रमुग्ध पनवेल ः प्रतिनिधीविरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न वारा, सोबत सूर्याची सोनेरी किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणार्‍या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरांनी पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या सुरेल मैफिलीचा श्रोत्यांनी कुटुंबासह आणि मित्रपरिवारासोबत मनमुराद आनंद घेतला आणि …

Read More »

रुग्णालयात अग्नितांडव

अहमदनगरमध्ये भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू अहमदनगर ः प्रतिनिधीयेथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व जण कोरोनाबाधित होते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेबद्दल …

Read More »

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चक्क आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविकांचा आधार

पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेतेमंडळी हिंगभर, तर कार्यकर्ते मूठभर. तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आहे. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ओढांगीच्या एका कार्यकर्त्या महिलेने वाशी येथे कार्यक्रम घेतला, पण तिला माहीत होते की कार्यक्रमाला गर्दी काही होणार नाही. म्हणून …

Read More »

नेरळमध्ये नव्याने डम्पिंग ग्राउंड; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कर्जत ः बातमीदार नेरळ या मोठ्या लोकवस्तीच्या आणि शहरीकरणाकडे झुकलेल्या गावात कचरा ही मोठी समस्या बनली आहे. अशातच नेरळ गावाची शान समजल्या जाणार्‍या गणेश घाटाच्या खाली आता नवीन कचरा डेपो बनविण्यात आला आहे. नेरळमध्ये झालेल्या नागरीकरणाबरोबर समस्यादेखील मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. यात साठून राहणारा कचरा आणि त्या कचर्‍याची विल्हेवाट …

Read More »

उरणमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेतील सुयश

उरण : प्रतिनिधी सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, चित्रकला, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत समीर म्हात्रे-निबंध, कृतुजा गावंड-रांगोळी, पार्थिव पाटील-चित्रकला, उपासना गावंड-वक्तृत्व यांनी ऑनलाईन स्पर्धेत सुयश मिळविले असून, ही स्पर्धा ग्रामीण भागातील, तसेच शहरी भागातील स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी घेण्यात आली होती. या ऑनलाईन …

Read More »

व्यापारी असोसिएशनतर्फे दीपावली मीलन उत्साहात साजरे

उरण : वार्ताहर दीपावली व नूतन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी असोसिएशन उरणच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) तेरापंथी हॉल वाणी आळी उरण शहर येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली मीलनचे आयोजन करण्यात आले होते. या दीपावली मीलन कार्यक्रमानिमित्त उरण शहरातील व्यापार्‍यांनी उपस्थित राहून एकमेकांना दिवाळीच्या …

Read More »

केदार भगत मित्र मंडळातर्फे दीपोत्सव साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करीत दिवाळी साजरी करीत आहोत, याचा मनापासून आनंद होत असल्याचे उद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. …

Read More »