Breaking News

Monthly Archives: November 2021

भाषेचा अभिमान असलाच पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातृभाषा आपल्या हृदयातील, तर राष्ट्रभाषा देशाच्या सन्मानाची भाषा आहे. त्यामुळे भाषा कोणतीही असो तिच्याबद्दल अभिमान प्रत्येकाला असतो आणि तो असलाच पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) येथे केले.ज्येष्ठ पत्रकार विजय कडू संपादित दै. वादळवारा, प्रवीण मोहोकर संपादित दीपस्तंभ, राज भंडारी संपादित …

Read More »

…अन् पालीतील भिंती झाल्या बोलक्या!

मूक व कर्णबधिर कलाकार चेतन पाशीलकरने चितारले प्राणी-पक्षी आणि प्रबोधनात्मक संदेश पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील मोकळ्या, जर्जर व खराब झालेल्या भिंती आता आकर्षक, विलोभनीय आणि प्रबोधनात्मक संदेश देणार्‍या झाल्या आहेत. मूक आणि कर्णबधिर कलाकार चेतन पाशीलकर याने प्राणी, पक्षी आणि प्रबोधनात्मक संदेश चितारून या भिंतीना बोलके केले आहे. …

Read More »

कर्जतमध्ये निराधार महिला, आदिवासींना फराळ-फटाक्यांचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी शहरातील दहिवली येथील शासकीय कृपा महिला वसतीगृहातील पीडित, निराधार महिलांना कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि जि.प.च्या माजी सभापती चित्राताई तिटकारे यांच्या सहकार्याने दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे. वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षक अनिता जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्रकार …

Read More »

खालापूरमध्ये जर्नालिस्टची असोसिएशनची स्थापना

अध्यक्षपदी अरुण नलावडे, तर उपाध्यक्षपदी जयवंत माडपे खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका व खोपोली शहर येथील असंघटीत पत्रकारांनी मंगळवारी (दि. 2) एकत्र येत खालापूर जर्नालिस्ट असोसिएशनची स्थापना केली. या संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण नलावडे तर उपाध्यक्षपदी जयवंत माडपे यांची निवड करण्यात आली. खालापूर तालुक्यातील असंघटीत पत्रकारांची बैठक मंगळवारी ताकई येथील एन. …

Read More »

महिलेच्या गळ्यातील गंठण लांबवली

कर्जत तालुक्यातील शेलू गावातील घटना कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू गावात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे गंठण खेचून पोबारा केला.  या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नेरळ येथे राहणार्‍या सुनिता परशुराम धुळे (वय 50) या शेलू गावात लहान नातीसह गेल्या …

Read More »

फणसाड अभयारण्यात आढळले देशातील सर्वांत मोठे फुलपाखरू

 भीमपंखी फुलपाखराची नोंद; शास्रोक्त पद्धतीने पक्षीगणना मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यात नुकतेच तीन दिवसीय पक्षी व इतर वन्यजीव गणना करण्यात आली. त्यात 155 पक्षी प्रजातींची नोंद झाली. या वेळी ’भीमपंखी’ या भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले. महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यातील  …

Read More »

रसायनमिश्रित फटाक्यांचा साठा जप्त

देवन्हावे येथे छापा; खोपोली पोलिसांची कारवाई खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पर्यावरणास घातक असणार्‍या विविध रसायनमिश्रित फटाक्यांचा मोठा साठा खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील गोदाममधून छापा घालून जप्त करण्यात आला. रसायनमिश्रीत फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत. या रसायन मिश्रीत फटाक्यांमुळे विशेषता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व …

Read More »

कर्जतचे विकास त्रिभुवन यांचा बंगळुरूमध्ये सन्मान

कर्जत : बातमीदार शहरातील विकास त्रिभुवन यांना बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी बंगळुरू येथील ए. डी. ए. रंगमंदिर …

Read More »

कर्जतमध्ये साकारला ईरशाळ गड

पाटील आळी मित्र मंडळाची 14 वर्षांची परंपरा कर्जत : प्रतिनिधी शहरातील पाटील आळी मित्र मंडळाने या वर्षी  किल्ले ईरशाळ या गडाची प्रतिकृती साकारली आहे. सध्याच्य युगात किल्ले आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे. मात्र किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा, त्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी कर्जतमधील पाटील आळी मित्र मंडळातर्फे …

Read More »

भाजपतर्फे कर्जतमध्ये फराळाचे वाटप

कर्जत : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे कर्जत नगर परिषदच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी  शहरातील कचरा साफ करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने कर्जत भाजपच्या वतीने सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. …

Read More »