महाविकास आघाडी सरकारच्या दारूविषयक उदार धोरणाला हास्यास्पद म्हणावे की संतापजनक हेच कळत नाही. गेली दोन वर्षे महाराष्ट्राची जनता कोरोना विषाणूशी प्राणपणाने झगडते आहे. कोरोनाविषयक जाचक निर्बंध आणि मृत्यूची टांगती तलवार या दोहोंमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणक्षेत्रापासून शेतकर्यांपर्यंत आणि व्यापार्यांपासून कामगारांपर्यंत समाजातील सर्वच घटक आर्थिक चणचणीमुळे बेजार झाले आहेत. …
Read More »Monthly Archives: January 2022
शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंची जहरी टीका माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून निजामपूर येथे बुधवारी (दि. 27) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर – महापौर कविता चौतमोल
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पनवेल शहराबरोबरच महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासालाही गती मिळत असून महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात केले. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर बुधवारी (दि. 26) …
Read More »रायगडात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
अलिबाग : प्रतिनिधी भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा झाला. पोलीस मुख्यालय, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. …
Read More »प्रा. एन. डी. पाटील यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल- लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी चेअरमन प्रा. एन. डी. पाटील सर आपल्या मनात कायमचे ठसलेले आहेत. त्यांचे काम पुढे नेण्यासाठी सतत जागृत राहूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. ते नवी …
Read More »पोलिसांच्या सरावावेळी गोळ्या घुसल्या घरात; अलिबागच्या कार्ले गावात भीतीचे वातावरण
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलीस गोळीबार सरावावेळी झाडण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्या कार्ले गावातील दोन घरांमध्ये घुसल्याची घटना गुरुवारी (दि. 27) घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही, मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. परहूरपाडा येथे गुरुवारी …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन
पुणे : प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे गुरुवारी (दि. 27) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल अवचट यांनी केवळ साहित्यविश्वच नाही, तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण …
Read More »रायगडातील पहिला हापूस आंबा मुंबई बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांना मिळाला मान रवाना
अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेट्यांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे. शिवाय एक केशरची पेटीही मुंबई बाजारात …
Read More »आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी (दि. 27) वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे, मात्र एक हजार चौरस फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक …
Read More »जिथे एक कमळ फुलते, तिथे अनेक कमळे फुलतात -दरेकर; पोलादपूरच्या नगरसेविका अंकिता जांभळेकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केल्याची चर्चा होत असली तरी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांच्या पाठिशी संपूर्ण राज्य आणि केंद्रातील भाजप ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या अंकिता जांभळेकर निवडून आल्या. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper