खोपोली : प्रतिनिधी करोनाच्या तिसर्या लाटेमुळे प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, मास्क न लावणार्यांविरोधात कारवाई करण्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर खोपोली व परिसरात कार्यवाही केली जात आहे. मास्क लावण्यावरून थोरवे बंधू सुरभी ज्वेलर्समधील गणेश नामक कर्मचारी आणि खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्यात रविवारी किरकोळ वाद झाला. तो …
Read More »Monthly Archives: January 2022
रायगड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष पडतोय अपुरा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात खाटा कमी पडत आहेत. तेथे फरशिवर गादी टाकून प्रसूतीसाठी येणार्या मातांवर उपचार केले जात आहेत. प्रसूती कक्षदेखील अपुरा पडत आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी येणार्या मातांची गैरसोय होत आहे. प्रसूती कक्षात खाटा वढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात …
Read More »कर्जत कळंब येथील गोदाम भाताने भरले
नवीन भात खरेदीत अडथळे कर्जत : बातमीदार मागील वर्षी खरेदी केलेल्या भाताची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने उचल केली नसल्यामुळे कळंब (ता. कर्जत) येथील गोदाम भाताच्या पोत्यांनी भरले आहे. त्यामुळे या हंगामात भाताची खरेदी करून साठवण करण्यात नेरळ विविध कार्यकारी सोसायटीला अडथळे येत आहेत. कर्जत तालुक्यात चार ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत …
Read More »नेरळमधील रेल्वेफाटक उडवून टेम्पोचालक फरार
कर्जत : बातमीदार नेरळ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार्या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर फाटक आहे. सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास टेम्पो पिकअप कार चालकाने हे फाटक उडवून तो फरार झाला. दरम्यान, फाटक नादुरुस्त झाल्याने गेटमनने रेल्वे सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी ते बंद केले. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब …
Read More »आम्ही मोदीजींच्या सोबत!
खोपोलीत भाजपचे स्वाक्षरी मोहीम अभियान खोपोली : प्रतिनिधी पंजाब राज्याच्या दौर्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई व बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केल्याचा आरोप करीत खोपोली भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि. 11) शहरातील दीपक चौकात आम्ही सर्व मोदीजींच्या …
Read More »कृषी व इको टुरिझमला अधिक पसंती
सुधागड तालुक्यात माती, कुड व बांबूची घरे सजली पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात नैसर्गिक संसाधने वापरून बनविलेल्या आकर्षक व आरामदायी घरांचा वापर आता कृषी व इको टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारे घरे बांधणार्या करागिरांची मागणीदेखील वाढली आहे. शहरातील अनेक लोक अशा घरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. मागील महिन्यात …
Read More »रायगडात बूस्टर डोस लसीकरण सुरू
अलिबागमध्ये मात्र सावळागोंधळ; ज्येष्ठ नागरिकांची तीन तास रखडपट्टी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ वर्कर यांच्यासाठी बूस्टर डोस लसीकरण सोमवार (दि. 10) सुरू करण्यात आले आहे. मात्र अलिबागमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन लसीकरण केंद्र वेळेत सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना तीन तास ताटकळत राहावे लागले. अलिबागमधील डोंगरे …
Read More »अखेर खोपोली शहर परिवहन सेवेची बस धावली
खोपोली : प्रतिनिधी गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोविड प्रादुर्भावामुळे आगारात विश्रांती घेत असलेल्या खोपोल नगर परिषदेच्या शहर परिवहन सेवेची बस सोमवारी (दि. 10) अखेर रस्त्यावर धावली. शहर परिवहन सेवेची बस सुरू करावी, यासाठी विविध संघटना, राजकीय पक्षांनी खोपोली नगर परिषदेला निवेदने दिली होती. शाळा, कॉलेज सुरू झाल्यामुळे विद्यार्थी खाजगी वाहनांनी …
Read More »कोरोना : उपाययोजना आणि दक्षता
कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. यामुळे मोठे आर्थिक-सामाजिक बदल घडले. मात्र शासनाने सावधगिरीने उपाययोजना केल्या आणि जनजीवन पूर्ववत होऊ लागले. शासनाच्या विशेष प्रयत्नातून मोठ्याप्रमाणात होणारे नुकसान टाळता आले. जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते, तेव्हा प्रचंड काळजी वाटते. तर जेव्हा संख्या कमी होऊ लागते, तेव्हा आपण निश्चिंत होतो. ही मानसिकता …
Read More »चांदई संघाने केपीएल जिंकली; खांडस संघ उपविजेता
कर्जत ः रामप्रहर वृत्त कर्जत प्रीमियर लीगमध्ये चांदई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले, तर आगरी वॉरियर्स खांडस संघ उपविजेता ठरला. पाच दिवस कशेळे येथील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना खांडस आणि चांदई या संघांमध्ये झाला. यात चांदई संघाने बाजी मारली. या संघात नितीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper