Breaking News

Monthly Archives: January 2022

राज्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कठोर होणार

मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही, मात्र निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनचाही प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 5) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य …

Read More »

फणसाड अभयारण्यात पक्षीगणना

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 जानेवारी या कालावधीत पक्षीगणना करण्यात येणार असल्याची माहिती अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मोठे असून समुद्र सपाटीजवळ असल्याने येथे विविध पक्षी वस्ती करावयास येतात. या अभयारण्यातील पक्षांच्या …

Read More »

मुरूड तालुक्यात 54 वीजचोरट्यांवर कारवाई

20 लाख रुपयांची दंडवसुली मुरूड : प्रतिनिधी वीजबिल जास्त येऊ नये म्हणून काही ग्राहक विविध क्लृप्त्या वापरून मीटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी करीत असतात. मुरूड तालुक्यातील वीजचोरी करणार्‍या 54 ग्राहकांवर महावितरणने धडक कारवाई करून सुमारे 20 लाख तीन हजार 461 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत …

Read More »

कर्जत-माथेरान मिनीबस सुरू करावी

भाजपची मागणी, एसटी आगारप्रमुखांना निवेदन माथेरान : प्रतिनिधी कर्जत-माथेरान मिनी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी भाजप माथेरान मंडलातर्फे कर्जत एसटी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कर्जत-माथेरान मिनी बससेवा बंद आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात, तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माथेरानचे …

Read More »

सुडकोळी येथील बांधबंदिस्ती उद्ध्वस्त

खाडीलगतच्या भातशेतीचे नुकसान रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोळी ग्रामपंचायत हद्दीत नवखार येथील समुद्रखाडीलगतची बांधबंदिस्ती डागडुजी नसल्याने उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे समुद्रखाडीचे पाणी घुसून भातशेतीचे अतोनात नुकसान आहे. दरवर्षीच अशा प्रकारे येथील शेतकर्‍यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने याबाबत ठोस भूमिका घेऊन बंधार्‍याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी …

Read More »

रिक्षाचालकाच्या मुलींनी जिंकले सुवर्णपदक

पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनी सेक्टर 14मधील रिक्षाचालक अरविंद मोकल यांच्या संयोगिता व हर्षदा या दोन्ही मुलींनी सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल अरविंद मोकल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींचे कौतुक होत आहे. मोकल हे रिक्षा व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलींना क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने रिक्षा व्यवसाय करून जमेल तशी मद्दत …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर प्रीमियर लीगचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियर लीग जल्लोष 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन माजी मंत्री व पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. हमरापूर येथील मैदानावर 5 ते 9 जानेवारीपर्यंत हे क्रिकेट सामने होणार आहेत. हमरापूर येथील प्रीमियर …

Read More »

उलवे नोड प्रीमियर लीगचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) झाले. ही स्पर्धा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणात पाच दिवस रंगणार असून स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. …

Read More »

पेण, माणगावात क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील सावरसई येथील शासकीय व उच्च माध्यमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, जयसपाल सिंह मुडा यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुणे नीरा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.  शाळेचे मुख्याध्यापक एच. …

Read More »

स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहा -प्रा. वृषाली विनायक

अलिबाग : प्रतिनिधी स्त्रीकडे स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. तिला जगण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. जोपर्यंत समाजाची मानसिक प्रगती होत नाही तोपर्यंत स्त्रीला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली विनायक यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त कुरुळ आरसीएफ …

Read More »