-संदीप भूशेट्टी, sbhushetty@gmail.com शेअर बाजारात युद्धाच्या वातावरणामुळे सध्या होत असलेली घसरण ही गुंतवणूकदारांना घाबरवून टाकणारी असली तरी गुंतवणुकीला तेव्हाच चांगली फळे येतात, जेव्हा ती अशा मोठ्या चढउतारांत ताऊन सुलाखून निघते. त्यामुळे या पडझडीतही गुंतवणूकदारांनी धीर धरून गुंतवणुकीतील सातत्याला धक्का बसू देता कामा नये. कोरोनाचे संकट कमी झाल्याने अर्थव्यवस्था रुळावर येत …
Read More »Monthly Archives: March 2022
तेलसंकट ही एकत्र येऊन जागरूकता वाढविण्याची संधी
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्वपदावर येत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत रशिया – युक्रेन संघर्षाने पुन्हा तणाव निर्माण केला आहे. तेलाची दरवाढ हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. तेलाच्या आयातीला सध्या तरी पर्याय नसला तरी त्याच्या अतिरेकी वापरावर काही निर्बंध आणि तेल वापराविषयी सर्वव्यापी जागरूकतेची आज गरज आहे. कोरोना …
Read More »शिक्षणाच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले
मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे यांनी केल्या भावना व्यक्त नवी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रयतेच्या कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने शेतसारा भरणारे करावे गाव, शिक्षणातही पुढेच होते. सुमारे 101 वर्षांपूर्वी शिक्षणाच्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. अशा ज्ञानरुपी शाळेचा मी मुख्यध्यापक असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना व्यंकटेश कांबळे यांनी …
Read More »स्वर्गीय संजय भोपी पुण्यस्मरणदिनी धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील स्वर्गीय संजय दिनकर भोपी यांच्या प्रथम स्मृतीदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्त भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय संजय भोपी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) प्रथम …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे डिजिटल उपकरणे भेट
नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या पालघर येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी वर्गाला कामकाज करणे सोयीचे व्हावे याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वखर्चातून लॅपटॉप, प्रोजेक्टर व वॉटर फिल्टर वितरीत केले. या वेळी मत्स्यव्यवसायासह आयुक्त पालव, परवाना अधिकारी नंदू पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रतिनिधी किशोर …
Read More »सिकेटी विद्यालयात बक्षिस वितरण समारंभ
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयाच्या इंग्रजी मध्यमच्या पूर्व प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ शनिवारी झाला. या कार्यक्रमाचे पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यामना नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवेल्या विद्यार्थ्यांना …
Read More »विवाहितेचा छळ; महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी येथील एका विवाहित महिलेने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार केल्यानंतर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा पतीसह सासू-सासरे व अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे तर्फे बिरवाडी येथील चोवीस वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने तसेच माहेरुन …
Read More »अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपीला 10 वर्ष कारावास अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिकेत अनिल वाजेकर असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली. आरोपी अनिकेत याची पीडित अल्पवयीन …
Read More »राज्यपालांना टार्गेट करणे असंविधानिक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सत्ताधार्यांवर टीका नागपूर ः रामप्रहर वृत्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधार्यांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. मात्र …
Read More »माणगावामधून अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा सापडला महाडमध्ये
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नाईटने गावातील अल्पवयीन मुलाचे बुधवारी दुपारी अपहरण अज्ञात व्यक्तीने केले होते. मात्र तो महाड एमआयडीसी पोलिसांना आढळला. माणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या आई्च्या हवाली केले. माणगाव तालुक्यातील नाईटने गावातील अंश अरविंद जाधव (वय 14) हा बुधवार (दि. 2) दुपारपासून हरवला होता. शोध घेऊनही तो …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper