Breaking News

Monthly Archives: March 2022

महिला संधीचे सोने करतात -विनायकराव देशपांडे

खोपोलीत अ‍ॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा या पुस्तकाचे प्रकाशन खोपोली : प्रतिनिधी संधी मिळाली तर महिला संधीचे सोनं नक्कीच करतात, हे अ‍ॅड. मीनाताई बाम यांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन विहिंप नेते विनायकराव देशपांडे यांनी शनिवारी (दि. 5) खोपोली येथे केले. विहिंप नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा …

Read More »

युक्रेनहून परतलेल्या पेणमधील श्रध्दाच्या कुटुंबीयांनी मानले केंद्र सरकारचे आभार!

भाजपच्या वैकुंठ पाटील यांनी घेतली भेट पेण : प्रतिनिधी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमधील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील श्रद्धा किशोर पाटील ही विद्यार्थिनी शनिवारी (दि. 5)सकाळी सुखरूप आपल्या घरी पोहचली. श्रद्धाचे वडील किशोर पाटील यांनी श्रद्धा घरी सुखरूप आल्यानंतर भारत सरकारचे आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. …

Read More »

महाडमध्ये आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

महाड : प्रतिनिधी लहान मुलांच्या आकाश पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री महाडच्या छबिन्यात घडली. या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आकाश पाळण्यांच्या तांत्रिक तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात निर्मिती फॅशन शो उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘निर्मिती फॅशन शो 2022’चे आयोजन करण्यात आले होते. सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या फॅशन …

Read More »

पनवेलमध्ये गटारे, रस्त्यांची सुरू असलेल्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील गटारे आणि रस्त्याच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 5) अधिकार्‍यांसह पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच गटारे सफाईची सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. पनवेल शहरातील साईनगर, कापड बाझार, …

Read More »

निर्बंध शिथिलतेनंतर व्यावसायिकांच्या आशा पल्लवित

ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद; खरेदीसाठी वर्दळ वाढली पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलसह नवी मुंबईतील निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापारी व दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यामुळे ग्राहकही आता कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पनवेल परिसरात महानगरपोलिकेतर्फे लसीकरणावर भर दिल्याने बाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे येथील …

Read More »

उरण येथे स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या सौजन्याने उरण शहरातील शासकीय कार्यालय येथे उरण शहरात मंगळवारी (दि. 1) सकाळी 7.30 ते 11 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता केलेल्या सरकारी कार्यालयाचे …

Read More »

सिडको गृहप्रकल्पात काही महिन्यातच भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष

नियोजन नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील बागेश्री गृहसंकुलातील नागरिकांचे मागील महिनाभरपासून पाण्याचे प्रचंड हाल सुरू आहेत. सिडको महामंडळाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत भाजपतर्फेही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2018 साली लॉटरी पद्धतीने …

Read More »

सिप्ला कंपनीमध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह

कर्मचार्‍यांसाठी विविध स्पर्धा रसायनी ः प्रतिनिधी पाताळगंगा एमआयडीसीमधील सिप्ला या औषध निर्माण करणार्‍या कारखान्यांमध्ये 4 मार्च रोजी 51 वा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने सर्व कर्मचार्‍यांनी कारखान्यातील अंतर्गत रस्त्यावर सुरक्षा जनजागृतीकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरक्षाविषयक घोषणा देण्यात आल्या. या सप्ताहाचे उद्घाटन पाताळगंगा एमआयडीसी परिक्षेत्रामधील औद्योगिक …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात बीट्स फेस्ट उत्साहात

खारघर ः रामप्रहत वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीतर्फे सहा दिवसाचे बीट्स फेस्ट मोठया उत्साहात पार पडला. गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधांमुळे महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही खंड पडला होता. मात्र यावर्षी महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बीट्स …

Read More »