Breaking News

Monthly Archives: April 2022

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो करताहेत स्वागत

ऐरोली-मुलुंड मार्गावर साकारल्या प्रतिकृती   नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संतवचने यांनी नवी मुंबईचे रुपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली-मुलुंड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या सुमारे 15 …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोपण करण्याच्या हेतूने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या एनसीसी विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 14) महाविद्यालयाच्या संकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पनवेल रोटरी क्लबचे सदस्य राजीव राघवन यांची …

Read More »

पनवेल महापालिका उपायुक्तपदी कल्पिता पिंपळे

पनवेल : रामप्रहर वृत्त ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून, मंगळवारी (दि. 19) आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते. कल्पिता किशोर पिंपळे …

Read More »

पेण वाशी विभागात गढूळ पाणी

ग्रामीण जलपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन; नागरिक संतप्त पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट भागामध्ये सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे, मात्र भाविकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गढूळ पाणी प्यावे लागल्याने संतापाची लाट पसरली. मागील अनेक वर्षांपासून खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठल वाडी, बोर्झे, लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, …

Read More »

खोपोली भाजपतर्फे सामाजिक न्याय पंधरवड्यानिमित्त उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे भारतात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र शासन प्रयत्नशील आहे. त्यातील प्रमुख अंगणवाडीतील बालकांना पोषणमूल्य आहार देण्यासंदर्भात हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या आदेशानुसार महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी …

Read More »

कर्जतमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी कर्जत ः बातमीदार तालुक्यातील गौरकामत गावातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी (दि. 18) समोर आली. काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या शाळकरी मुलीची फसवणूक करून बलात्कार केला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 20 ते 30 वयोगटातील 10 तरुणांना ताब्यात घेतले. या …

Read More »

चिंध्रण सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून लोहार समाजाला निधीवाटप

कळंबोली ः प्रतिनिधी चिंध्रण सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 15 टक्के निधीतून एनटीबी विश्वकर्मा लोहार समाजाला भांड्यांच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अपंगांना पाच टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य व ओबीसी …

Read More »

पिरकोनमध्ये गॅस हाताळणीबाबत प्रात्यक्षिकासह जनजागृती

उरण ः बातमीदार तालुक्यातील पिरकोन गावात सूर्या गॅस कंपनी कर्मचारी प्रतिक्षा म्हात्रे हिने गॅस हाताळणी कशी करायची याबाबत योग्य ती माहिती पिरकोन गावातील भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या निवासस्थानी नागरिकांना प्रात्यक्षिके देऊन दिली. गॅस हाताळणीविषयी प्रत्यक्षिके व जनजागृती घराघरात व्हायला पाहिजे आणि ती काळाची गरज असल्याचे भाजप तालुका उपाध्यक्ष …

Read More »

उरण एसटी कर्मचारी हजर झाल्याने बससेवा पूर्ववत

उरण : प्रतिनिधी मुंबई विभागाच्या उरण एसटी आगारात संपकरी कामगार हळूहळू पुन्हा कामावर येण्यास सुरुवात झाली असून 230 कर्मचार्‍यांपैकी सुमारे 200 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे 50 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण एसटी आगाराचे प्रमुख सचिन मालशे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील एसटी कर्मचारी …

Read More »

महिला मोर्चातर्फे नवीन पनवेलमध्ये अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाल कल्याण विभागामार्फत देशभरात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेलच्या वतीने नवीन पनवेल येथील आंगणवाडी क्रमांक 10मधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पं. …

Read More »