Breaking News

Monthly Archives: July 2022

गटारीसाठी फार्महाऊस सज्ज; मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक

पोलिसांची राहणार नजर पेण ः प्रतिनिधी अवघ्या दोन दिवसांवर आलेली गटारी साजरी करण्यासाठी बेत आखले जाऊ लागले आहेत. याकरिता सुरक्षित मानले जाणार्‍या फार्महाऊसना पसंती दिली जात आहे. एकीकडे मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक असताना दुसरीकडे पोलिसांचीही गैरकृत्यांकडे नजर असेल. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी गटारी साजरी केली जाते. या दिवशी …

Read More »

कामोठ्यात सकल हिंदू समाज पदयात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशभरामध्ये हिंदू नववर्ष शोभायात्रा, श्री रामनवमी, हनुमान जयंती मिरवणुकांवरील हल्ले, हिजाब आंदोलनापासून ते नुपूर शर्मा यांच्या समर्थकांचे झालेले खून या सर्व देशभर होणार्‍या घटनांना वाचा फोडण्यासाठी कामोठ्यात रविवारी (दि. 25) हिंदू समाज जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत भाजपचे …

Read More »

रायगड जिल्हा कॅरम स्पर्धेत पनवेलचा सुरेश बिस्ट अजिंक्य

कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कॅरम दिन तसेच असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैभव राज कॅरम क्लब आयोजित जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा झाली. स्पर्धेत पुरुष खुल्या गटात पनवेलच्या सुरेश बिस्टने अजिंक्यपद पटकावले. महिला खुल्या गटात खोपोलीच्या अनिता कनोजिया तर वयस्कर गटात कर्जत …

Read More »

राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे सुयश

रिलायन्स नागोठण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर (ओडिशा) येथे झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या वॉटर पोलो संघाने द्वितीय, तर मुलांच्या वॉटर पोलो संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये नागोठण्यातील रिलायन्सच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या …

Read More »

नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 13 व 14 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. या …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये प्रशांत ठाकूर यांचा समावेश

भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश आहे, अशा शब्दांत त्यांचे राज्याचे माजी मंत्री व भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले. ते शनिवारी (दि. 23) पनवेल येथे तेली समाज महासंघातर्फे आयोजित बैठकीत बोलत होते. …

Read More »

खोपोलीतील झेनित धबधब्यावर पुण्याचा पर्यटक जखमी

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर रविवारी (दि. 24) पर्यटनासाठी आलेला पुण्याचा पर्यटक पाय घसरून जखमी झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त मदत टीमच्या सदस्यांनी या पर्यटकाला रुग्णालयात दाखल केले आहे. भागवत कोळपेकवार असे या जखमी पर्यटकाचे नाव आहे. तो मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर …

Read More »

पोलादपुरातील वडाचा कोंड गावनजीक डोंगराला भेगा

प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वडाचा कोंड गावालगत डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तेथे पाहणी करून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दिप्ती देसाई यांनी दिली. मागील वर्षी 22 जुलै रोजी अतिवृष्टीमध्येे महाड तालुक्यातील तळिये येथे …

Read More »

आता 24 तास फडकविता येणार तिरंगा; केंद्र सरकारकडून ध्वजसंहितेमध्ये बदल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. …

Read More »

पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी

 सराईत गुन्हेगारा गजाआड; 70 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरातील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील पंप रूमचे बंद खिडकीची काच उघडून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून कॉम्प्युटर लॅबमधील 60 …

Read More »