पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात (स्वायत्त) शैक्षणिक वर्ष 2022-2023पासून एमएससी इन डेटा अॅनॅलिटिक्स, एमकॉम इन बिझनेस अॅनॅलिटिक्स आणि पीजी डिप्लोमा इन अॅनॅलिटिकल इन्स्ट्रूमेंटेशन या नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मुळे समग्र शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल …
Read More »Monthly Archives: July 2022
महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची पुढील आठवड्यात पनवेलमध्ये बैठक
प्रमुख नेत्यांनी केले पदाधिकार्यांना मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुढील आठवड्यात पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे …
Read More »नामांतरावर आज अधिकृत निर्णय
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारने राज्यातील दोन शहरे आणि विमानतळ नामांतराबाबत घेतलेले निर्णय हे सरकार जेव्हा अल्पमतात तेव्हा घेतले होते. त्यामुळे ते निर्णय बेकायदेशीर असून आम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये अधिकृतपणे याबाबत निर्णय घेणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 15) दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास …
Read More »विठ्ठल नामाच्या गजरात पनवेलकर दंग
पनवेल ः रामप्रहर वृत्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विठ्ठल नामाचा गजर गुरुवारी घुमला. भाजप उत्तर रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलतर्फे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त ‘भेटला विठ्ठल माझा’ हा सुश्राव्य गाण्यांच्या मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांना उदंड प्रतिसाद लाभला. आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक …
Read More »पनवेलमध्ये तब्बल 362.59 कोटींचे हेरॉईन जप्त
पनवेल ः परदेशातून अवैधरित्या आयात केलेला 362.59 कोटी रुपयांचा हेरॉईन नामक अमली पदार्थ पनवेल तालुक्यातील अजिवली येथील नवकार लॉजिस्टिकमध्ये जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. दुबई येथून कंटेनरमध्ये अमली पदार्थ दडवून न्हावाशेवा पोर्ट येथे आणल्याची व हा माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती नवी मुंबई …
Read More »गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा -वर्षा ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थी आपल्या गुरूकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षकानेही आपले आचरण चांगले ठेवायला हवे व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्या वर्षा ठाकूर यांनी केले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागाच्या वतीने …
Read More »नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा
पनवेल ः प्रतिनिधी सिडकोमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील रहिवाशांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या विभागातील पाणीपुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी …
Read More »सीकेटी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम झाला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. …
Read More »आजपासून सिंगल युज प्लॅस्टिकवर कारवाई
पनवेल मनपा करणार अंमलबजावणी पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानूसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल युज प्लॅस्टिकवर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात शनिवार (दि. 16)पासून सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्लॅस्टिकबंदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांना …
Read More »कामगार क्षेत्रात आत्मप्रेरणेने काम करा -सुधीर घरत
उरण : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघ संलग्न असणार्या 32 महासंघांचे अखिल भारतीय पाच दिवसीय अभ्यासवर्ग शिबीर 13 ते 17 जुलै या कालावधीत नागपूर येथे होत आहे. या शिबिरात भारतीय मजदूर संघाला संलग्न असणार्या 32 महासंघाचे सुकाणू समितीचे 124 पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या वेळी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper