Breaking News

Monthly Archives: July 2022

रोहा तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीची प्रात्यक्षिके

रोहे : प्रतिनिधी यांत्रिकी पध्दतीने भात लागवड फायदेशीर असून त्याची प्रात्यक्षिके रोहा तालुक्यात घेण्यात आली आहेत. या यांत्रिकी पध्दतीच्या भात लागवडीचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे. मजूरांचा तुटवडा व त्यामुळे घटत चाललेले भात क्षेत्र यावर उपाय म्हणून यांत्रिक पध्दतीने भात लागवड करणे …

Read More »

बाईक रॅलीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत

43 स्थानकांना भेटी व 1665 किमीची मजल कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने 1 जुलैपासून विविध स्थानकांवर ’आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये बाइक रॅली सुरू झाल्या आहेत. बाईक रॅलींनी मध्य रेल्वेवरील एकूण 1665 किमी …

Read More »

रेवस-आवरे पोर्टसाठी घेण्यात आलेल्या जमिनी परत करा

भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी पून्हा मूळ शेतकर्‍यांच्या नावे करण्याची मागणी भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून केली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी …

Read More »

पेणमध्ये 12 लाखांच्या दागिन्यांची चोरी

चार तासात आरोपी जेरबंद पेण ़: प्रतिनिधी पेण खाटीक आळी येथील सुवर्ण कारागिराच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पेण पोलिसांनी पनवेलमधून दोन जणांना अटक केली आहे. सुमन विरेंद्र बेरा (वय 26) यांचा पेण खाटीक मोहल्ल्यात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे.  …

Read More »

धेरंड गावात घुसले उधाणाचे पाणी

अनेक घरांतील सामानाचे नुकसान अलिबाग : प्रतिनिधी दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे गुरुवारी (दि. 14) अलिबाग तालुक्यातील धेरंड गावतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. गुरुवारी समुद्राला मोठी भरती आली. खरबंदिस्ती फुटली असल्यामुळे उधाणाचे पाणी धेरंड गावात शिरू लागले. त्यामुळे गावकर्‍यांची तारांबळ उडाली. उधाणाचे पाणी काही घरांमध्ये घुसले. या घरांमधील …

Read More »

शेलू रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू गावातील मुख्यरस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. या शेलू स्टेशनरोडचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र रस्त्याचे काम सुरु झाले नाही, त्यामुळे तो निधी परत गेला होता. कर्जत तालुक्यातील शेलू येथे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. शेलू गावातून रेल्वे …

Read More »

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा

भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांच्याकडून सरकारी निर्णयाचे स्वागत अलिबाग ः प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करीत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे पाच आणि तीन रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी स्वागत केले आहे. भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस …

Read More »

रायगड जिल्ह्यातील 17 धरणे ओव्हरफ्लो

 पाटबंधारे विभागाची तीन धरणे भरण्याच्या मार्गावर; श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात सर्वांत कमी पाणीसाठा रोहे : महादेव सरसंबे जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील निम्याहून जास्त धरणे भरली आहेत. या विभागाची रायगड जिल्ह्यात 28 धरणे आहेत, त्यापैकी 17 धरणे 100 टक्के भरली आहेत. तीन धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ …

Read More »

गढूळ पाण्यामुळे पालीकरांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबानदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा …

Read More »

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कारकिर्दीची चौकशी व्हावी

भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी …

Read More »