नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोड येथील प्रभाग 30मधील रहीवाशांच्या माहितीसाठी आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. प्रभाग 30 मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर 12,2,7, 8,9, 10 (काही भाग), सेक्टर 11 ,15, 16, 16 …
Read More »Monthly Archives: July 2022
नवी मुंबईत पावसाचे थैमान
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गेल्या 24 तासांत नवी मुंबईत सरासरी 84.68 मिमी पाऊस झाला. यामुळे एपीएमसी मसाला मार्केट आणि महापे एमएसआरडीसी ते इंदिरा नगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापनच्या …
Read More »मराठी माणसाने उद्योजक बनण्याची तयारी ठेवावी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नवी मुंबईत आवाहन नवी मुंबई : बातमीदार मराठी माणसाने उद्योजक बनण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते नवी मुंबईत मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. नारायण राणे म्हणाले, राजनाथ सिंग यांच्या फोननंतर उध्दव ठाकरे रागावले …
Read More »पनवेलमध्ये गुरुवारी ‘भेटला विठ्ठल माझा’; सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्त आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने गुरुवारी (दि. 14) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलमध्ये ’भेटला विठ्ठल माझा’ सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्या या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत नेरे विभागात मंगळवारी (दि. 12) वह्यावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …
Read More »रायगड जिल्ह्यातील 16 धरणे पूर्ण भरली
अलिबाग : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यात धरणामध्ये पाणीसाठी वाढू लागला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांपैकी 16 धरणे पूर्ण भरली आहेत. जून महिन्यात अनियमित पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. 12 जुलैपर्यंत 918 मिलीमिटर पावसांची नोंद झाली आहे. जुलै …
Read More »जि. प., पं. स. आरक्षण सोडत तूर्त स्थगित
अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे होणार्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कोकण आयुक्त आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. या नुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच …
Read More »उरणमध्ये घर कोसळून आदिवासी बांधवाचा मृत्यू
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर मुसळधार पावसात घर अंगावर कोसळून एका आदिवासी बांधवांचा जागीच मृत्यू, तर त्याची पत्नी, मुले जखमी झाल्याची घटना उरण तालुक्यातील जांभुळपाडा आदिवासी वाडीत घडली. मागील पाच दिवसांपासून पडणार्या जोरदार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून काही रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. …
Read More »कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस
पुढील दोन दिवस काही भागांत अतिवृष्टीचा इशारा मुंबई : प्रतिनिधी कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिम किनार्यावर द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज …
Read More »अखेर राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेचा दौपदी मुर्मू यांना पाठिंबा
खासदारांच्या वाढत्या दबावानंतर उद्धव ठाकरे यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अखेर शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामध्ये येत्या 18 जुलै …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper