पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्यामुळे शिष्टाईमुळे एका केळी व्यापार्याला न्याय मिळाला आहे. त्यामुळे व्यापार्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील केळ्याचे व्यापारी अक्षय पोटे यांनी आपला माल पनवेलमधील एका व्यापार्याला विकला होता, मात्र तो त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. याबाबत अक्षय …
Read More »Monthly Archives: July 2022
सीबीडी परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण
परिसरात दुर्गंधी; वाहिन्या बदलण्याची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सीबीडीतील जीर्ण मलनिस्सारण वाहिन्यांतून दुर्गंधीयुक्त पाणी गळत आहे. परिणामी, येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सीबीडी सेक्टर 2मध्ये ए टाईपची 19 चौमीची बैठी घरे आहेत, तर सेक्टर …
Read More »विद्यार्थिनीला मारहाणप्रकरणी शिक्षिकेवर कारवाईची मागणी
पनवेल ः वार्ताहर हरिग्राम येथील अशोक माळी यांची 12 वर्षांची मुलगी एंजल अशोक माळी हिला शाळेतील शिक्षिकेने बेदम मारहाण केली. यात तिच्या कानाला मार लागला. त्यामुळे ती भीतीने रात्रभर न झोपता रडत असल्याचे पालकांकडून सांगण्यत आले. या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. एंजल माळी ही केवाळे येथील …
Read More »अल्पवयीन मुलाचा अपहरणकर्ता अटकेत; भिवंडी येथून मुलाची सुटका
पनवेल : वार्ताहर पनवेल भागात राहणार्या कामगाराच्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून 30 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या सैबुद्दीन आलम (35) याला ठाण्यातील नारपोली पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे, तसेच त्याच्या ताब्यातून अपहृत मुलाची सुटका करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले …
Read More »कोपरखैरणे ते ठाणे मार्गावर विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू
भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही बस सुरू करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार …
Read More »रायगड जिल्ह्यातील खेळाडू नोकर्यांच्या प्रतीक्षेत
पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणार्या रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर औद्योगिकरण होत आहे. मोठमोठे प्रकल्प येत आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा क्रीडाक्षेत्रामध्येही प्रगती करत आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचले आहेत. यापैकी अनेकांना रोजगार नाहीत. त्यांना नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे बर्याच खेळाडूंची कारकिर्द संपली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये या जिल्ह्यातील खेळाडूंना …
Read More »धक्क्यांवर धक्के
महाराष्ट्रात घडून आलेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर राजकारणाचा ज्वर काहिसा ओसरेल असे वाटले होते. परंतु दिवसेंदिवस तो वाढतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी केलेल्या एकगठ्ठा उठावानंतर आता शिवसेना या पक्षाला जणु गळतीच लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथीला घेऊन शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली, तेव्हा सत्तेचा हव्यास हा …
Read More »पनवेल मनपाच्या शेवटच्या महासभेत सदस्य भावूक
कथन केले पाच वर्षांतले अनुभव पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा बुधवारी (दि. 6) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या वेळी सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेनंतर नगरसेवकांच्या निरोप समारंभ झाला. या वेळी अनेक सदस्य पाच वर्षांतील अनुभव …
Read More »रायगडात पावसाचे धुमशान कायम
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर पाणी; आपटा गावात शिरले नदीचे पाणी अलिबाग : रामप्रहर वृत्त गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून पाताळगंगा व कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुन्या मुंबई- पुणे महामार्ग येत सुमारे 1 …
Read More »दिघी पोर्टचे काम जलदगतीने सुरू करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 7) झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अॅथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली. महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनेला पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper