कर्जत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले कर्जत : बातमीदार सुरुवातीपासून हुलकावण्या देणार्या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. भाताची रोपे तयार होण्यासाठी आवश्यक असा पाऊस सध्या होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.दरम्यान, भातशेतीसाठी गरजेचे असलेली पाणी शेतात दिसू लागल्याने बळीराजा समाधानी आहे. …
Read More »Monthly Archives: July 2022
कमकुवत दरडीमुळे ताम्हिणी घाटातील प्रवास असुरक्षित
पावसाळ्यात पुणे-माणगाव रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गावर दरडी कोसळण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. …
Read More »अलिबागमध्ये भाजपचा विजयी जल्लोष
अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयासमोर येथे शनिवारी (दि. 2) विजयी जल्लोष करण्यात आला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, …
Read More »पोलादपूर तालुक्यातील सवाद येथे कृषिदिन
पोलादपूर : प्रतिनिधी हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पोलादपूर तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) सवाद येथे कृषिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. सवाद ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा बुडबाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी एन. वाय. घरत यांनी कृषिदिन …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 26
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे? अ. टाटा …
Read More »बाजारात तांत्रिक विश्लेषणाला महत्व का आहे?
शेअरबाजार सोप्पा आहेअसं सर्वांनाच वाटतं.. खालच्या भावात खरेदी करायची अन वरच्या भावात विक्री.. त्यात काय अवघड आहे. परंतु ग्रेटर फूल थिअरीप्रमाणं प्रत्येक भावात कोणी ना कोणी खरेदीदार व विक्रीदार असतो आणि तो स्वतःला चलाख समजत असतो कारण खालच्या भावात विकणार्याला वाटत असतं की भाव अजून खाली येतील तर घेणार्याला वाटत …
Read More »बाजाराच्या तीव्र चढउतारात टिकून राहण्यासाठी
शेअर बाजारातील सध्याचे चढउतार सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पेलवणारे नाहीत. अशावेळी अनेक भारतीय गुंतवणूकदार बाजाराच्या गुंतवणुकीपासून लांब जातात. अशागुंतवणूकदारांनी बाजारातील गुंतवणुकीचा फायदा म्युच्युअल फंडाच्या मार्गाने का आणि कसा घेतला पाहिजे? यावर्षी जानेवारीत 61 हजार अंश पार करणाराशेअरबाजाराचा सेन्सेक्स पुढील सहाच महिन्यात म्हणजे जूनमध्ये सुमारे 10 हजारांनी म्हणजे 51 हजारांवर खाली आला. एवढेच …
Read More »पावसाळी पर्यटनासाठी फार्महाऊसला अधिक पसंती
जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, समुद्र किनारे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणार्या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र येथे होणारे अपघात आणि दुर्घटना यामुळे अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परिणामी अनेकजण सुरक्षित …
Read More »विकासाचे नवे पर्व
शिंदे-फडणवीस या जोडीने पहिल्याच बैठकीत जलयुक्त शिवार योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा इरादा जाहीर केला आणि सोबत मुंबईतील मेट्रो रेल्वेची कारशेड आरे येथील भूखंडावरच उभारण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ठाकरे सरकारने अडचणीत आणलेला प्रकल्पही आता वेगाने पुढे रेटला जाईल यात शंका नाही. पायाभूत सोयींचे …
Read More »मुरूडमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सन्मानित
मुरूड : प्रतिनिधी जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून अँटिकरप्शन फाउंडेशनच्या वतीने मुरूड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांना शुक्रवारी (दि. 1) मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी आपण डॉक्टरांकडून उपचार व सल्ले घेत असतो. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा देवदूत असतो, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper