दोन लहानग्यांना चावा; नवी मुंबईत उपचार सुरू उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील कंठवली गावात दोन चिमुकल्या मुलींना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली असून या जखमी मुलींना तालुक्यातील दोन्ही शासकीय रुग्णालयांत उपचार न मिळाल्याने नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंठवली गावातील मैथिली विनोद ठाकूर (वय 3) व …
Read More »Monthly Archives: August 2022
ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यात भाजपच नंबर वन!
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात झालेल्या 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने कायम राखली आहे. या यशाबद्दल मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, …
Read More »लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा क्षेत्रांत कार्यरत असणारे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी शुक्रवारी (दि. 5) शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. सर्वांत आधी सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे वडील माजी खासदार लोकनेते …
Read More »देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया - आमदार प्रशांत ठाकूर
तिरंगा फडकविण्याचे आवाहन कर्जत : प्रतिनिधी आपण जसा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे आपल्या देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी बूथमधील 10 घरांवर तिरंगा ध्वज लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून विविध सरकारी योजना त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी लक्ष द्यावे, …
Read More »नावडे गावाजवळ कॉन्व्हेक्स सेफ्टी मिरर
भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर यांचा पुढाकार कळंबोली ः प्रतिनीधी पनवेल-मुंब्रा महामार्गावर नावडे गावाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे गावात रस्ता ओलांडताना अंडरपासमधून जावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून येणार्या गाड्या दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे जीवितहानी टाळावी म्हणून भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर यांनी स्वखर्चातून कॉन्व्हेक्स सेफ्टी मिरर …
Read More »सीकेटी कॉलेज येथे आविष्कार संशोधन अधिवेशन कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) व मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने 17व्या आंतरमहाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशनाच्या कार्यशाळेचे बुधवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले हाते. या वेळी मुंबई विद्यापीठ विशेष कार्यासीन अधिकारी मीनाक्षी …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. त्यापैकी पळस्पे ते इंदापूर (84 किमी) हा पहिला टप्पा आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून सुरू झालेल्या या पहिल्या टप्प्याच्या कामाने अद्यापही गती घेतलेली नाही. याबरोबरच इंदापूर ते कशेडी (77 किमी) हा चौपदरीकरणाचा पुढील …
Read More »महागाईचा आडोसा
ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशभर आंदोलने करण्यात आली खरी, परंतु त्याला पुरेशी धार नव्हती. अखेर ईडीचा मुद्दा थोडा मागे टाकून महागाईच्या आडोशाआड दडून कुटिल कारवाया करण्याचे उद्योग काँग्रेस नेत्यांनी आता सुरू केले आहेत. शुक्रवारी त्याचे प्रत्यंतर आले. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने सुरू केलेल्या चौकशीचे निरनिराळे पडसाद भारताच्या राजकारणात बघायला मिळत …
Read More »हर घर तिंरगा अभियानासंदर्भात बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरात राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत भाजप पनवेलच्या वतीने प्रभाग क्र. 14 ते 20मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि. 4) पनवेल …
Read More »पनवेलकरांची साथरोग तपासणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रभाग क्र. 18 येथील वाल्मिकीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भाजप शहर सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेल, शहर संयोजक प्रसाद हनुमंते व उत्तर रायगड ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद म्हात्रे यांच्यातर्फे भरवण्यात आले. या वेळी कामगारांचा उत्स्फूर्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper