Breaking News

Monthly Archives: August 2022

चोळईमध्ये धान्य कुजल्याने कशेडी घाटाच्या प्रारंभी प्रचंड दूर्गंधी

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चोळई गावाच्या हद्दीत ट्रक कोसळल्यानंतर सांडलेल्या तूस आणि धान्यावर पावसाचे पाणी पडल्याने प्रचंड प्रमाणात दूर्गंधी पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या दूर्गंधीमुळे अनेक वाहनचालकांना ओकारीसाठी उबळ येत असल्याचे दिसून आले आहे. पोलादपूर शहरापासून केवळ दीड किमी अंतरावरील कशेडी घाटातील चोळई गावात यंदा अपघाताचे …

Read More »

नेरळ-कळंब एसटीसाठी थोड थांबावे लागणार

दोन ठिकाणचा रस्ता करावा लागणार दुरुस्त कर्जत : प्रतिनिधी नेरळ-कळंब राज्यमार्गावरील 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद आहेत. त्याचा फटका 50हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. या रस्त्याची प्रशिक्षण बस आणून चाचणी घेतली मात्र रस्ता दोन ठिकाणी दुरुस्त केल्यास …

Read More »

घोणसे घाटांत पुन्हा अपघात

दैव बलवत्तर म्हणून वाचला बल्कर म्हसळा : प्रतिनिधी माणगाव-दिघी या रस्त्यावरील घोणसे घाटातील केळेवाडी येथील एका तीव्र वळणावर मंगळवारी (दि. 2) भरधाव वेगाने चाललेल्या बल्करचा भिषण अपघात झाला. या अपघातात बल्कर पलटी झाल्यामुळे वाचला अन्यथा तो दरीत कोसळला असता आणि वित्त आणि मनुष्यहानी झाली असती. सीमेंट बल्कर (एमएच-46,पी-123) जेएसडब्ल्यू वडखळ …

Read More »

ट्रेकर्स आणि शिव भक्तांनो सावधान

भिमाशंकर अभयारण्यातून जाताय… स्वच्छता कर भरायला लागणार कर्जत : बातमीदार बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथील मंदिरात श्रावण महिन्यात लाखो भाविक जात असतात. मुंबईकडील भागातील शिवभक्त आणि ट्रेकर्स हे भिमाशंकर अभयारण्यातून चालत जातात. मात्र त्यांच्याकडून वन विभाग स्वच्छता कर वसूल करीत आहे. वन विभागाच्या या कृतीने शिवभक्त आणि ट्रेकर्समध्ये नाराजी …

Read More »

नेरळ कॉलेजमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

रायगड हॉस्पिटलकडून विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य शिबीर; 84 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या  पथकाने 86विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या वेळी आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांवर डिकसळ येथील …

Read More »

रोह्यात अन्नदान, वृक्ष लागवड

भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष विलास डाके यांचा वाढदिवस निमित्ताने उपक्रम धाटाव : प्रतिनिधी भाजप कामगार मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष तथा  राजमुद्रा फाउंडेशनचे सल्लागार विलास डाके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) भुवनेश्वर अदिवासीवाडीतील 50 कुटुंबातील सदस्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयालगत वृक्ष लागवड करण्यात आली. भारतीय जनता युवा …

Read More »

रायगडात पावसाची दडी

बळीराजा चिंतेत अलिबाग : प्रतिनिधी जुलै महिन्याच्या मध्यात जोरदार कोसळल्यानंतर आता रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेले आठ दिवस ऊन पडत आहे. त्यामुळे भात रोप करपण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.  बळीराजाची चिंता वाढली आहे. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिल्यास भाताची रोप सुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. …

Read More »

सैन्याधिकारी पालकांच्या मुलीची एक आगळी देशसेवा!

कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही  बर्‍यापैकी अशीच असू शकते, मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते, तर आईदेखील सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद …

Read More »

पनवेलमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त हातमाग व यंत्रमाग कापड विक्री

परेश ठाकूर यांच्या हस्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांच्यावतीने हातमाग व यंत्रमाग कापड विक्री व प्रदर्शन पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. …

Read More »

आमदार महेश बालदींनी घेतली सिडको प्रशासनासोबत बैठक

प्रलंबित असलेलेल्या विषयांवर सकारात्मक चर्चा उरण : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी सिडको प्रशासनासोब प्रलंबित असलेल्या विषयांबाबत बैठक घेतली. विविध समस्यांसंदर्भांतील प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दिल्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी प्रलंबित प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, …

Read More »