रेवदंडा ः प्रतिनिधी चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी, प्राचीनकाळी चौलमध्ये 360 मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस असलेले चौलचे शितळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. चौलच्या आंबेपुरी पाखडीत हिरव्या गर्द नारळ पोफळीच्या छायेत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. या देवतेवर आंग्रे घराण्याची दृढ श्रद्धा होती. आंग्रे काळातच 1759मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे …
Read More »Monthly Archives: September 2022
तांबटमाळ-चिंबोड स्वप्नातील गाव म्हणून घोषित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती
पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनवण्यात आली आहेत. सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड हे यामधील एक स्वप्नातील गाव. फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या गावाची स्वप्नातील गाव म्हणून घोषणा केली. स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रुवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, …
Read More »रोह्याच्या डॉ. देशमुख महाविद्यालयात विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींसाठी महाविद्यालयाच्या सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांच्या हस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात …
Read More »माणगावात शिवसेनेला खिंडार
युवा नेते आदेश महाडिक भाजपमध्ये; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत माणगाव : प्रतिनिधी शिव अवजड वाहतूक सेनेचे माणगाव तालुकाध्यक्ष युवानेते आदेश महाडिक (रा. भागाड) यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आदेश महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता
नागोठणे : राज वैश्यंपायन नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या ग्रामदैवतांची घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नागोठणे विभागासह रायगड जिल्ह्यातील भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात भक्तगणांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नागोठण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून मंदिर परिसरात तीन …
Read More »करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांची पूर्तता करावी
आमदार महेश बालदी यांची मागणी उरण : रामप्रहर वृत्त उरण येथील करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांबाबत व इतर प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे मत्सव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीस आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि मच्छीमार बांधव उपस्थित …
Read More »कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन कार्यरत रहा – लोकनेते रामशेठ ठाकूर
उलवे नोड : रामप्रहर वृत्त प्रत्येक विद्यार्थ्याने कर्मवीर अण्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत रहावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 28) उलवे नोड येथे केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई व मराठी माध्यामिक विद्यालयात आयोजित ‘रयत’चे …
Read More »ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी
वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेचे भाजपकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबविणार्या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दांत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. केवळ …
Read More »नवीन पनवेल, खांदा कॉलनीत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा
भाजपचे 11 ऑक्टोबरला सिडको टाळे बंद आंदोलन पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोनिर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल व खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणार्या अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेलमधील कार्यालय येथे टाळे बंद …
Read More »‘पीएफआय’वर बंदी केंद्र सरकारकडून मोठे पाऊल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पीएफआय संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात एनआयएने महाराष्ट्रासह देशात 15 ठिकाणी छापेमारी करीत सुमारे 106 पीएफआय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper