दुबई : वृत्तसंस्था आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि. 3) सुपर-4चा महामुकाबला होणार आहे. याआधी उभय संघात झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील लढती रोमहर्षक …
Read More »Yearly Archives: 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांना विरोधकांकडे कोणतेही उत्तर नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन झाली आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी कामे केली आहेत त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री …
Read More »गणेशोत्सवात जीवनावश्यक साहित्य वाटप
कर्जत : प्रतिनिधी शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था-जिते आणि गुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते व कुंभे आदिवासी वाडीमध्ये दैनंदिन वापराच्या घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. गुंज फाउंडेशनचे आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच अॅड. रंजना धुळे व हर्षद (सोनु) भोपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्त जिते व कुंभे आदिवासी …
Read More »नागोठण्यात मित्रानेच केली मित्राची हत्या
नागोठणे : प्रतिनिधी मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागोठणे गवळ आळीमध्ये राहणार्या साहिल संजय कडू (वय 18) या तरुणाला त्याचाच मित्र प्रितेश गजानन केदारी (वय 23) या तरुणाने गळा दाबून ठार केल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. …
Read More »श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावर दोन प्रवासी निवारा शेडचे भूमिपूजन
म्हसळा : रामप्रहर वृत्त भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावरील नागलोली व भरडोली येथे एसटी बस थांबे बांधण्यात येणार आहेत. सुमारे पाच लाख रुपये खर्चाच्या या बस थांब्यांच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 2) भाजपचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत …
Read More »गणेश विसर्जनासाठी खोपोली नगरपालिका सज्ज !
खोपोली : प्रतिनिधी शहरातील विरेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या अनेक वर्षापासून गणेश विसर्जन केले जात होते. त्याच तलावातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे तलावातील पाणी प्रदुषण रोखण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक अनुप दुरे यांनी कंबर कसली असून गणेश विसर्जनासाठी त्यांनी कृत्रिम तलाव आणि मोबाइल कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. खोपोली शहर पर्यावरणमुक्त …
Read More »मेळाव्याचे महाभारत
दसर्याला अद्याप महिनाभराहून अधिक अवकाश असला तरी गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीयवर्तुळात मात्र गाजतो आहे तो शिवाजी पार्कवरील ‘दसरा मेळावा’च! आताच्या घडीला शिवसेनेतील उद्धवठाकरे समर्थकांचा गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट आणि महाराष्ट्रनवनिर्माण सेना अशा तिघांकडूनही हा मेळावा घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मात्र जे …
Read More »पाली-खोपोली मार्गावरील पूल रखडले
पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली, भालगुल व जांभूळपाडा या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असे आश्वासन एमएसआरडीसी व तत्कालीन शासनाने दिले होते, मात्र आजही येथील धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे पाली अंबा नदी पुलावरून यंदाही पाणी गेले. त्यामुळे तासन्तास इथली वाहतूक खोळंबली. नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, …
Read More »कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘जलसंजीवनी’
कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या तीन ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जलसंजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आला. ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, उपव्यवस्थापक एम. एस कांबळे, समूह संघटक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ …
Read More »सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड पोलीस दलाला प्रथम क्रमांक
अलिबाग : प्रतिनिधी क्राईम एंड क्रिमिनल नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आपला दबदबा कायम राखला आहे. पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. मागील काही महिन्यात रायगड जिल्ह्याने सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करीत दरमहा प्रथम पाचमध्ये स्थान प्राप्त केले होते. तद्नंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper