Breaking News

Yearly Archives: 2022

कृतज्ञता सप्ताह सांगता समारंभाच्या तयारीचा आढावा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली पाहणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताहा अंतर्गत संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ …

Read More »

पदपथावर अवैध धंदे, पार्किंगची समस्या

पनवेलमध्ये वाहतूक शाखेची कारवाई सातत्याने व्हावी; नागरिकांची मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत पदपथावरील अवैधधंदे दुचाकी आणि  चारचाकी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालताना त्रास होत आहे. एखादा अपघात झाल्यावरच त्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. नवीन पनवेलमध्ये …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे यांना परदेशातील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त वैज्ञानिक प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात संधी मिळाली असून त्यांच्या भरारीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करून बळ दिले आहे. प्रज्ञेश म्हात्रे हे युनायटेड स्टेट अर्थात अमेरिकेत एअरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहेत. श्री. रामशेठ …

Read More »

कर्जतमध्ये एक्स्प्रेस गाड्यांना पूर्ववत थांबा द्यावा,

भाजपचे सुनील गोगटे यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची तसेच विद्यार्थी, चाकरमान्यांची गैरसोय होते. भाजप किसान मोर्चाचे कोंकण समन्वयक सुनील गोगटे यांनी केंद्रीय राज्य मंत्र्यांची भेट घेऊन कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, …

Read More »

पोलादपुरातील महत्वाच्या ग्रामपंचायती बिनविरोध

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्याने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पैशांचा चुराडा टळल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर …

Read More »

कनिष्ठ विस्तार अधिकार्‍यांची पदे 31 डिसेंबरपूर्वी भरणार

शिक्षक समन्वय समितीला शिक्षणाधिकार्‍यांचे आश्वासन सेवानिवृत्तीनंतरचे लाभ निवृत्तीच्या दिवशीच मिळणार अलिबाग, माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागातील कनिष्ठ विस्तार अधिकार्‍यांची तब्बल 32 पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. ही बाब लक्षात घेवून ही पदे तातडीने भरण्यात यावीत असा आग्रह शिक्षक समन्वय समितीने धरला आहे. …

Read More »

मद्यपी बसचालकाचा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

उलवे नोडमधील धक्कादायक प्रकार पनवेल : वार्ताहर उलवे नोडमधील आयएमएस गु्रप ऑफ स्कूलचा चालक चक्क दारू पिऊन बस चालवत असल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 13) घडला. त्यामुळे बसमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यधुंद चालकाने विद्यार्थ्यांनी भरलेली बस ही उभ्या असलेल्या रिक्षेला ठोकली. त्या वेळी या बसचालकाला उभेही राहता येत …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बैठकांवर भर

पनवेलमध्ये तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी घेतला आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली नितळस, नेरे, शिवकर आणि शिरढोण येथे मंगळवारी (दि. 13) आढावा बैठका झाल्या. या बैठकांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी …

Read More »

…तर नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्रांना संघर्ष करावा लागला नसता!

मंत्री रवींद्र चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीका डोंबिवलीतील आगरी महोत्सवाचे शानदार उद्घाटन डोंबिवली : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे हा तसा छोटासा विषय होता. मनाचा मोठेपणा दाखविला असता तर भूमिपुत्रांसह आगरी समाजाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी संघर्ष …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात अतिथी व्याख्यान

पदवीधारक विद्यार्थ्यांना औद्योगिकदृष्ट्या मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे पदवीधारकांकडून औद्योगिक अपेक्षा याविषयावर अतिथी व्याख्यान शनिवारी (दि. 10) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे संस्थापक, कॉलिटी सोलुशन लॅबोरेटरी बेलापूर श्याम नारायण कोळी, …

Read More »