Breaking News

Yearly Archives: 2022

कर्जतमध्ये बर्निंग कार

कर्जत : प्रतिनिधी कल्याण येथून लोणावळा येथे निघालेली फोर्ड कंपनीची डटसन गाडी कर्जत येथील चार फाटा येथे जळून खाक झाली आहे. कल्याण येथील चिकन घर येथे राहणारे किरण मोतीराम भोईर हे फोर्ड कंपनीच्या डटसन गाडी (एमएच 04 जीजे 9733) घेऊन आपल्या शेजारी राहणारे रजनीश चौबे यांना लोणावळा येथे डायलिसिससाठी घेऊन …

Read More »

ढाक भैरी डोंगरावर गिर्यारोहकाचा मृत्यू

खोपोली, कर्जत : बातमीदार कर्जत व मावळ तालुक्यातील लोणावळा नजीक असलेल्या ढाक बहिरी या डोंगरावर औरंगाबादच्या गिर्यारोहकाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 5) घडली. औरंगाबादचे प्रतीक आवळे, पंकज गावडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ व सागर जयस्वाल हे पाच जण गिर्यारोहणासाठी ढाक भैरी या डोंगरावर आले होते. गिर्यारोहण करीत …

Read More »

माणगाव-ताम्हाणी मार्गावर धोकादायक वळणे

अरुंद रस्त्यामुळे अपघाताला आमंत्रण; घाटातील प्रवास पर्यटकांसाठी ठरते डोकेदुखी माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाची संरक्षक भिंती धोकादायक आहेत. हा रस्ताही अरुंद व अवघड वळणाचा असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा येथून येणार्‍या पर्यटक, प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. येथील धोकादायक …

Read More »

गोवेले येथील शिवकालीन गणपती मंदिर

माणगाव तालुक्यातील गोवेले हे गाव गर्द हिरव्यागार झाडीत वनराईच्या सानिध्यात असून तेथील गणपती मंदिर पेशवेकालीन आहे व मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पुरातत्त्व खात्यामध्ये हे मंदिर पेशवेकालीन असावे अशी नोंद आहे, कारण श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव असून ते गोवेले याचमार्गे श्रीवर्धनला जात …

Read More »

अखेरचा हा तुला दंडवत…!

जीवनचक्र अविरतपणे सुरू असते. एकाने विराम घेतला तर त्या व्यक्तीची जागा दुसरे कुणीतरी घेत असते, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, जी ध्रुव तार्‍याप्रमाणे अढळ असतात. अशा दुर्मीळ असामींपैकी संगीत क्षेत्रातील एकमेवाद्वितीय गानसम्राज्ञी म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या निधनाने दैवी सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गोव्याचे मंगेशकर घराणे संगीतकलेचे निस्सीम …

Read More »

15 वर्षे आमदार राहिलेले सुरेश लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर?

कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचे आमदार म्हणून 15 वर्षे काम करणारे सुरेश लाड आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत, खालापूर तालुक्याच्या राजकारणात एवढा मागे का गेला आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, शिससेनेचे वाढते प्रस्थ आणि शिवसेना आमदारांचे तालुक्याच्या राजकारण आणि प्रशासनातील वाढते वर्चस्व यामुळे सुरेश …

Read More »

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लतादिदींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात कर्करोग दिनानानिमित्त ऑनलाइन अतिथी सत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त 04 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन  विद्यार्थी-विद्यार्थीनीमध्ये कर्करोग तथा विशेषत्वाने स्तनांचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराबद्द्ल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

पटेल ज्वेलर्सच्या दागिन्यांची कमी किंमत आणि योग्य भाव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील पटेल ज्वेलर्सच्या सर्व शोरूममध्ये ग्राहकांची  खरेदी सुलभ व कमीत कमी योग्य किंमतीत व्हावी म्हणून या पुढे कुठलेही दागिना किंवा वस्तू पीएसपीवर विकली जाईल. पीएसपी म्हणजे पटेल ज्वेलर्स का सही प्राईज पीएसपी ही किंमत इतर कुठल्याही ब्रँड किंवा दुकानांच्या तुलनेने कमीत कमी व योग्य भावात असेल. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षण

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवसायिका शिक्षण शाखेतील तसेच तंत्रशिक्षण व पारंपारिक शाखेतील विद्यार्थ्यांच्या मुलाखतीविषयी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी इंग्लिश असोसिएशनच्या अंतर्गत गुरुवारी (दि. 3) मुलाखत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंग्लिश असोसिएशच्या डॉ. महादेव चव्हाण यांनी …

Read More »