Breaking News

Yearly Archives: 2022

संत रामानुजाचार्यांचे विचार मार्गदर्शक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; हैदराबादमध्ये भव्य मूर्ती स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटीचे लोकार्पण हैदराबाद : वृत्तसंस्था जेव्हा देशात रुढीवादी परंपरा होती, भेदाभेद होता त्याकाळात संत रामानुजाचार्य यांनी समानतेचा विचार दिला. ज्या दलितांना अस्पृश्य समजले जात होते, त्यांना रामानुजाचार्य यांनी सन्मान दिला. त्यांनी भेदाभेद दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार हे समतेवर …

Read More »

जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञाान महाविद्यालयातीलमहिला विकास कक्षार्फे शुक्रवार (दि. 4) जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिला आरोग्य व कर्करोग जागरूकता या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. गौरी जोशी या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. हा दिवस …

Read More »

कर्जत ताडवाडी येथे आदिवासी महिलांना मारहाण

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथील जमिनी (सर्वे नंबर33/2) मध्ये शुक्रवारी (दि. 4) जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी महिलांना तेथील तरूणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील …

Read More »

मोरे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीला क्षेत्रभेट

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल्स येथे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थिनींना ’पाणी शुद्धीकरण प्रक्रिया’ या सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत क्षेत्रभेटीमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती देण्यात …

Read More »

मुरूड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची वानवा

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून कायम स्वरुपी वैद्यकीय अधीक्षक नियुक्त न केल्यामुळे रुग्णसेवेत अनियमिता दिसून येत आहे. मुरूड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची तातडीने नियुक्ती करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. मुरूड ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. विजय हाडबे हे एकमेव वैद्यकिय अधिकारी नियुक्त …

Read More »

कर्जत दामत येथील अवैध कत्तलखान्यांवर धाड

गोमांसासह जीवंत जनावरे ताब्यात कर्जत : बातमीदार रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी (दि. 4) पहाटे कर्जत तालुक्यातील दामत गावात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी गोमांस विकणार्‍या एकास अटक केली असून, 215 किलो गोमांस जप्त करण्यात आले. कत्तलीसाठी आणलेली काही जीवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली असून …

Read More »

पेणमधील सोनखार रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून आत्तापर्यंत पाच कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून विकासकामांचा हा झंझावात यापुढेदेखील सुरू राहणार आहे, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी शनिवारी (दि. 5) दिली. आमदार रविशेठ पाटील …

Read More »

ट्रेडिंगचे प्रकार, त्याचा कालावधी आणि जोखीम

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com मागील लेखात ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल आपण जाणून घेतलं. आता ट्रेडिंगचे प्रकार आणि त्याच्या कालावधीबद्दल पाहूयात. स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्‍यांना स्काल्पर्स म्हणतात. मोठ्या प्रमाणात शेअर्स किंवा युनिट्सची लगेचच खरेदी-विक्री करून झटपट नफा-नुकसान पदरात पडून घेणार्‍यांस स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात …

Read More »

उद्याच्या अपरिहार्य बदलांचे दिशादर्शन करणारा अर्थसंकल्प!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com देशाच्या अर्थसंकल्पाकडे राजकीय आणि करसवलतीपुरता अर्थसंकल्प असे न पाहता, देशाच्या विकासाची येत्या काही वर्षातील दिशा म्हणून पाहिले तर काय दिसते? अर्थसंकल्प देशाला सर्वार्थाने जोडणारा तर आहेच, पण त्यात भारतीय अर्थव्यवस्था टेक ऑफ स्टेजला नेण्याची क्षमताही आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला जगाच्या व्यासपीठावर जी संधी निर्माण झाली आहे, …

Read More »

खांदा कॉलनीत पोळी भाजी, स्नॅक्स कॉर्नरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 9 येथील श्रीकृष्णा गार्डन सोसायटी  येथे कुणबी समाज संस्था, पनवेल यांच्या महिला विभाग पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन श्री अन्नदा पोळी भाजी आणि स्नॅक्स कॉर्नर सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 4) माघी गणेशोत्सव दिनी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी …

Read More »