Breaking News

Yearly Archives: 2022

पालीत संकष्ट चतुर्थीला फुलला भक्तीचा मळा

ट्रस्टचे चांगले नियोजन, व्यवसायिकांचा धंदा तेजीत पाली : प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त व अष्टविनायकांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी (दि. 21) संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कोविडच्या तिसर्‍या लाटेत देखील कोरोना नियमांचे पालन करीत भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शन घेताना दिसून आले. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या …

Read More »

शेडाशी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सतीश कदम विजयी

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण एक जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून सतीश रामचंद्र कदम यांना 228 मते मिळून ते विजयी झाले आहेत. शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग तीनमधील पोटनिवडणुकीसाठी त्या प्रभागात भाजप, शिवसेना आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये भाजपचे सतीश रामचंद्र …

Read More »

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा

कर्जत शहर भाजपचे पोलिसांना निवेदन कर्जत : बातमीदार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. त्या अपशब्दांबद्दल नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्जत शहर भाजपच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली. नाना पटोले यांना अटक करण्याची …

Read More »

विविध मागण्यांसाठी भाजपची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी चर्चा

माथेरान : प्रतिनिधी एप्रिल व मे महिन्याच्या ऐन पर्यटन हंगामात पाण्याची कमतरता भासू नये आणि शारलोट लेकमधील पाण्याचा उपसा करण्यात येऊ नये या सर्वांचे नियेजन आतापासून करण्यात यावे या मागणीसाठी नवीन पनवेलचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी व कर्जतच्या उपविभागीय अधिकारी कंटे मॅडम यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. माथेरान हे दुर्गम …

Read More »

पर्ससीन नेट मच्छीमारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी वहिवाटीनुसार पर्ससीनधारकांना सप्टेंबर ते मे महिन्यापर्यंत महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मच्छीमारीस परवानगी द्यावी, या व इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील पर्ससीन नेट मच्छीमारांनी गुरुवार (दि. 20)पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर असोसिएशनचे रायगड शाखा अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, सचिव आनंद बुरांडे, …

Read More »

हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे सुपुत्र आणि 1942च्या चलेजाव आंदोलनात सहभागी झाल्यानंतर हुतात्मा झालेले हिराजी गोमाजी पाटील यांची 108वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकात कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने जयंती उत्सवाचा सोहळा आयोजित केला होता. मानिवली येथील हुतात्मा हिराजी …

Read More »

मुरूडमधील विधवा महिला रंजना तांबे यांचे बेमुदत उपोषण दुसर्या दिवशी स्थगित

मुरूड : प्रतिनिधी वहिवाटीच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम तोडून टाकावे, या मागणीसाठी मुरूड तालुक्यातील विहूर बौद्धवाडीतील रंजना तांबे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी गटविकास अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रंजना तांबे यांनी दुसर्‍या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. शेजारी मोनीश तांबे व महेंद्र तांबे यांनी स्वतःच्या घराचे वाढीव …

Read More »

स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. 547 प्रकल्पग्रस्तांना रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने नोकरीत समावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड प्रकल्पासाठी नागोठणे परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या वेळी …

Read More »

गप्पागोष्टींच्या मैफलीत पोपटी पार्ट्यांची धूम

लग्नाला या, पूजेला या, यात्रेला या असे निमंत्रण आपण नेहमी ऐकतो, पण आता पोपटीला या असे निमंत्रण देखील ऐकावयास मिळत आहे.  सध्या जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरू आहे. विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी, बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध …

Read More »

इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून त्यांंनी ही माहिती दिली, तसेच येत्या 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश …

Read More »