Breaking News

Yearly Archives: 2022

नेरळमध्ये सिद्धगड बलिदान दिन : हुतात्म्यांना अभिवादन, गौरव पुरस्कारांचे वितरण

कर्जत : बातमीदार नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून रविवारी (दि. 2) सिद्धगड बलिदान दिन साजरा करण्यात आला. या वेळी हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला आमदार महेंद्र थोरवे आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला नेरळच्या सरपंच उषा पारधी यांनी पुष्पहार …

Read More »

पेणमध्ये पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार; आरोपीचा पोलीस ठाण्यात गोंधळ

पेण : प्रतिनिधी पोलीस असल्याच्या फायदा घेत विवाहित महिलेला धमकी देऊन तिच्यावर गेली सहा वर्षे शारीरिक अत्याचार करणार्‍या एका पोलीस कॉन्स्टेबलला पेण पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीने ड्युटीवर असणार्‍या पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. रायगड पोलीस दलाच्या अलिबाग …

Read More »

पोलादपूर नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी 17 उमेदवारी अर्ज

पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या मतदानानंतर दुसर्‍या टप्प्यातील चार प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेससोबतच भाजपने अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत आहे. प्रभाग 2मध्ये कल्पेश मोहिते (काँग्रेस), मनोज प्रजापती (शिवसेना), संभाजी  माने (भाजप), अमित भुवड (काँग्रेस) आणि साहिल जाधव …

Read More »

कर्जतमध्येही लसीकरणाला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील महाविद्यालयात जाणार्‍या 15 ते 18 वयोगटातील 6774 विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी कर्जत तालुक्यात कशेळे, कर्जत आणि कडाव या तीन ठिकाणी सोमवारी (दि. 3) लसीकरण शिबिर घेण्यात आले. मंगळवारपासून तालुक्यात नऊ ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार असून केवळ आठ दिवसांत हे …

Read More »

रायगड जिल्ह्यात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणास प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 3) किशोरवयीन (15 ते 18 वयोगट) मुलामुलींच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. त्याला युवापिढीकडून चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरण होणार असल्याने मुलामुलींनी पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. सुमारे दीड लाख मुलामुलींना याचा लाभ होणार आहे. अलिबाग येथील डोंगरे हॉलमध्ये झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; रायगड केंद्राची प्राथमिक फेरी उत्साहात

पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी (दि. …

Read More »

राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित …

Read More »

मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनासोबतच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच ओमायक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात

पनवेल ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सोमवारी (दि. 2) देशभरात प्रारंभ झाला. पनवेल महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांत असेलल्या 10 शाळांमध्येदेखील लसीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत 4500 मुलांचे लसीकरण झाले. पनवेल मनपा क्षेत्रातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन के. व्ही. …

Read More »

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

सुदैवाने एकाचाही मृत्यू नाही अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारावर पोहचली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत दुपटीने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असले तरी अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही ही समाधानाची बाब आहे. डिसेंबर महिन्याच्या …

Read More »