कंपन्यांचे दुर्लक्ष; प्रशासनाने लक्ष देण्याची जनतेतून मागणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जनतेला नेटवर्कची समस्या भेडसात आहे. मोबाइल नेटवर्क सतत जाम होत असल्याने नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. इंटरनेट व नेटवर्क यावर आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र सुधागड तालुक्यात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे. …
Read More »Yearly Archives: 2022
तुरमाळे, सांगुर्लीत हर घर जल मिशन योजना
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल मिशन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे पनवेल तालुक्यात या योजनेकरिता एक कोटी सहा लाख रुपयांचा निधीची मंजूर झाला आहे. यामध्ये …
Read More »रोटरी’कडून पनवेल मनपा आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि सोनोग्राफी मशीन
पनवेल : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलकडून पनवेल महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 (गावदेवी पाडा) या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन देण्यात आले आहे. एमजीएममधील सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 या वेळेत या प्राथमिक आरोग्य …
Read More »माथेरानमध्ये विक्रमी प्रवासी कर वसुली
माथेरान ़: प्रतिनिधी प्रवासी कराची वसुली कर्मचार्यांमार्फत सुरू केल्यामुळे माथेरान नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडली आहे. दिवाळीच्या हंगामात 24 ते 30 ऑक्टोबर या केवळ सात दिवसात एकूण 40 हजार 350 पर्यटकांकडून नगर परिषदेला 20 लाख 53 हजार इतकी विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. माथेरान नगर परिषदेतर्फे दरवेळी प्रवासी कर वसुलीचा …
Read More »टीम इंडियाचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय
सेमीफायनलचा मार्ग मोकळा अॅडलेड : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी (दि. 2) बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र पाऊस थांबल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करीत सामना फिरवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने 20 षटकांत …
Read More »अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना सरकारचा दिलासा
नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबरमधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 2) राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. …
Read More »अॅड. उज्ज्वल निकम यांची माणगावच्या निकम स्कूलला सदिच्छा भेट
माणगाव : प्रतिनिधी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी नुकताच माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर सायन्स कॉलेजला सदिच्छा भेट दिली. माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. एस. निकम यांनी पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, परंतु सुसंस्कृत नाही.आज मला सर्वात चांगली …
Read More »जनकल्याण समितीतर्फे आदिवासी वाड्यांवर भाऊबीज ओवाळणी
म्हसळा : प्रातिनिधी दिवाळीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या रोहा शाखेतर्फे शनिवारी (दि. 29) मुरूड तालुक्यातील वाळवटी आदिवासीवाडीमध्ये भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी 33 आदिवासी महिलांना नविन साड्यांचे वाटप करण्यात आले. जनकल्याण समितीची पुर्वा पाळंदे हिने कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ज्येष्ठ संघ कार्यकर्ते अविनाश दाते यांनी सांघिक गीत म्हटले. …
Read More »विहूरमधील विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील किमान शंभर विद्यार्थी रोज नांदगाव हायस्कूलमध्ये जातात. मात्र बस उपलब्ध नसल्याने त्यांना शाळेच्या वेळेत पोचता येत नव्हते. मुरूड आगाराने रोज सकाळी 9.30 वाजता मुरूड-नांदगाव बस सुरू केली आहे. या गाडीचा विहूर, मोरे परिसरातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विहूर ग्रामपंचायत …
Read More »मन प्रसन्न असेल तर सर्व काही प्राप्त करू शकता -प्रल्हाद वामनराव पै
कर्जत : प्रतिनिधी मन हे जीवनाचे केंद्र आहे. मन प्रसन्न झालं की तुम्ही सर्व काही प्राप्त करून घेऊ शकता. मन म्हणजेच जाणिव जेव्हा तुम्हाला नियंत्रित करते, तेव्हा तुमचं जीवन भरकटत जातं मात्र जेव्हा आपण जाणिवेला नियंत्रित ठेवतो तेव्हा भरभराट होते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper