Breaking News

Yearly Archives: 2022

मानाची राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ

प्रथम क्रमांकास एक लाख रुपये अन् करंडक पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा नववे …

Read More »

पंतप्रधानांकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

मोरबी : वृत्तसंस्था गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत 130पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) भेट देत पाहणी केली. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी सोमवारी …

Read More »

टी-20 वर्ल्डकप : भारताची बुधवारी बांगलादेशविरुद्ध लढत

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी (दि. 2) बांगलादेशशी होणार आहे, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अ‍ॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असेल. भारताने यंदाच्या विश्वचषकातील पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध सलग दोन विजय नोंदविले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय …

Read More »

पनवेलमध्ये पाण्याची नवीन पाईपलाईन

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने  शहरातील धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे नवीन आठ इंची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणार्‍या या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. …

Read More »

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा कमी करावी

पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाची मागणी   पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा दोन महिन्यांवरून 14 दिवसांची करण्यात यावी, अशी मागणी पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितच्या वतीने कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. …

Read More »

उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे दाखल

उरण : रामप्रहर वृत्त पाऊस लांबल्याने ऑक्टोबर हिट ही उशिरा सुरू झाली असून आठवडा भरापासून सुरू झालेल्या कडक उन्हात अंगाची काहिली होत आहे. ती शमविण्यासाठी उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे आले आहेत. मात्र ताडगोळ्यांचे आगमन लांबल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे 120 डझन आहे. ताडगोळे महाग असले तरी त्याला …

Read More »

रसायनीत, उरण येथे छठपुजा साजरी

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसराने वेढलेला भाग  असल्याने या परीसरात कामानिमित्त व व्यवसायासाठी आलेले हिंदी भाषिक नागरिकांची मोठी संख्या आहे. हे नागरिक गेल्या पंचवीस वर्ष छठपुजा उत्सव मोहोपाडा तलाव, रिस पुल व पाताळगंगा नदीकाठी मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. रसायनीतील मोहोपाडा तलाव, रिस पुलाजवळ हिंदी भाषिक नागरिक …

Read More »

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात प्रतिमापूजन

उरण : वार्ताहर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दिन व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांचे जीवन कार्य व त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व डॉ. …

Read More »

रसायनीत शपथ आणि दौड कार्यक्रम

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली शपथ आणि दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त रसायनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार आणि नागरिक …

Read More »

प्रकल्पग्रस्तांकडून बीपीसीएल कंपनीला गेटबंद आंदोलनाचा इशारा

उरण :  प्रतिनिधी बीपीसीएल कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांनी न्याय मिळवून घेण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी बीपीसीएल कंपनीला गेटबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला उरण तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे 150 प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील 30 वर्षांपासून अद्यापही नोकर्‍यांपासून वंचित आहेत. या प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांचा नोकर्‍यांसाठी गेल्या …

Read More »