आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्या नव्या पुलाच्या उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत …
Read More »Yearly Archives: 2022
दिल्ली पोलिसांची न्हावा शेवा बंदरात मोठी कारवाई; 1725 कोटींचे ड्रग्ज जप्त
उरण : रामप्रहर वृत्त उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 1725 कोटींचे 22 टन हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या …
Read More »आरपीएलसाठी खेळाडूंचे ऑक्शन
परेश ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त बहुचर्चित आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या दुसर्या हंगामासाठी खेळाडूंची ऑक्शन प्रक्रिया सोमवारी (दि. 19) झाली. या वेळी स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक संघाच्या कर्णधाराला टी-शर्ट देण्यात आले. …
Read More »रक्तदान शिबिराला रोहेकरांचा प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका भाजपच्या वतीने भाटे वाचनालयात मंगळवारी (दि. 20) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रोहेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »रायगडातील रेशन दुकानांना मिळणार आयएसओ मानांकन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना आयएसओ मानांकन देण्याची योजना जिल्हा पुरवठा विभागाकडून राबविण्यात येणार आहे. रेशनधारकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. रेशन दुकानांची तपासणी करून दुकानचालकांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील प्रत्येकी 10 दुकानांचा या योजनेत समावेश आहे. यामुळे …
Read More »’शिवतीर्थ’वर घुमणार पंतप्रधान मोदींचा आवाज
ना. मुनगंटीवारांकडून राज ठाकरेंना खास गिफ्ट चंद्रपूर : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्यावर आहेत. या दौर्यानंतर त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज ऐकायला येणार आहे, कारण चंद्रपूर येथे आलेल्या आलेल्या राज यांना भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास गिफ्ट …
Read More »भाजप महिला मोर्चाकडून दुर्लक्षित अंगणवाड्या दत्तक घेऊन सेवाकार्य
जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील यांची माहिती खोपोली : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवड्यांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर रायगड जिल्ह्याच्या नऊ मंडलातील अंगणवाड्या दोन महिन्यांसाठी दत्तक घेतल्याची माहिती महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी स्थानिक प्रतिनिधीशी बोलताना …
Read More »सुपारी देऊन ‘त्या’ महिलेची हत्या; किलरसह सहा जण जेरबंद
पनवेलमधील प्रकरणाचा छडा पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर 15 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या प्रियंका रावत या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर यात सामिल असलेला प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत, त्याची प्रेयसी निकिता मतकर, तिचा साथीदार प्रवीण घाडगे तसेच तिघे सुपारी किलर अशा एकूण सहा जणांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांनी …
Read More »माथेरान, पालीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; अनेकांना घेतला चावा
माथेरान, सुधागड : प्रतिनिधी प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान आणि अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पिसाळलेल्या, भटक्या व जखमी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी माथेरानमध्ये एकाच दिवशी 11, तर पालीत आठवडाभरात 10 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माथेरानमध्ये मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे स्थानिकांना तसेच पर्यटकांना फिरणे अवघड …
Read More »मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित
मुंबई : प्रतिनिधी विविध कायदेशीर बाबींचा तिढा सोडवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समितीला मान्यता दिली आहे. या समितीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper