Breaking News

Monthly Archives: January 2023

भाताण बोगद्यानजीक सहा जणांच्या टोळीने एकास लुटले

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे. आजिनाथ राख (वय 37) हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या ताब्यात असलेल्या मारुती सुझुकी झेन एस्टिलो गाडी (एमएच 43 एएल 3055) या गाडीतून ठाणे बाजूकडून पुणे बाजूकडे …

Read More »

श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर

रेवदंडा : प्रतिनिधी राजस्थानमधील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल निरूपणकार श्री. सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधी विद्यापिठाचे कुलपती डॉ. श्री. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी धर्माधिकारी यांना दिले. यापूर्वी या विद्यापिठाने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोसायट्यांच्या असोसिएशनचे उद्घाटन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 18मधील ठाकूर रेसिडेन्सी, श्रीटुडे स्मरण, बेला विस्ता, एस. के. ठाकूर, लाईफ स्पेस, नैवेद्य स्मृती, राजरत्न पार्क, उलवे श्रमिक, ऋषिकेश अव्हेन्यू, भक्ती दर्शन, कामयानी कुंज या 11 सोसायट्यांनी मिळून अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघात परिवर्तन होणार!

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा ना. उदय सामंत यांना विश्वास माणगाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची या वेळची निवडणूक परिवर्तनाची असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव येथील प्रचार सभेत …

Read More »

लोधिवलीतील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून प्रजासत्ताक दिनी लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. लोधिवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप नेते विनोद साबळे, लक्ष्मण पारंगे, लक्ष्मण पवार, उत्तम भोईर, …

Read More »

पोलादपुरात होतेय सार्वजनिक मालमत्तेची चोरी

पोलादपूर तालुक्यात शेती वगळता दुसर्‍या कोणत्याही व्यवसायाची पाळंमुळं रूजली नसल्याने गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक मालमत्तेची चोरी तसेच भंगारासोबत इंधन रसायनाच्या चोरीचेही धंदे फोफावू लागले आहेत. पोलादपूर शहरातील भैरवनाथनगरमधील पाणीपुरवठयाची सिंन्टेक्स्टची साठवण टाकी तुकडे तुकडे करून भंगारामध्ये विकल्याच्या घटनेवरून राजकारण तापल्यानंतर अशाप्रकारच्या अनेक साठवण टाक्यांचे तुकडे ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनांची वासलात …

Read More »

प्रजासत्ताकाचे सिंहावलोकन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनासमितीने तयार केलेले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आणि तितकीच संपन्न अशी संस्कृती पाठिशी असलेला आपला देश हे एक प्रजासत्ताक आहे याची आठवण अधोरेखित करणारा हा दिवस आपल्यापैकी प्रत्येकाने मनोभावे साजरा करावा असाच. आपल्याकडे काय आहे याचे मोल …

Read More »

पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

रायगडच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन सुरू अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी शुक्रवारी (दि.  27)संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील …

Read More »

चेंढरे ग्रामपंचायतीची डिजीटल करवसुली

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी  प्रत्येक घराला दिलेल्या क्यूआर कोडने मोबाईल अँड्राईड अ‍ॅपद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा उपक्रम राबवला जात …

Read More »

रिक्षाने घेतला अचानक पेट

दोन जण जखमी नवी मुंबई : बातमीदार महापे-शीळफाटा मार्गावर ठाकुर पाडा येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली आहे. रांगेत उभ्या असलेल्या एका गॅस बाटल्यात काही बिघाड होता. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने हाताने गॅस सोडण्याचा प्रयत्न केला आणि अचानक पेट …

Read More »