लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील 1250 आदिवासी बांधवांना 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मथुरा-अयोध्या-काशी …
Read More »Monthly Archives: February 2023
डिलिव्हरी न करता मोबाईल स्वतःकडे ठेवणार्या दोघांना अटक
पनवेल : वार्ताहर फ्लिपकार्ट कंपनीतर्फे ग्राहकांना वितरण करण्यासाठी आलेले मोबाईल परस्पर अन्यत्र विक्री करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करणार्या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 3 लाख 41 हजार 406 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. निलेश सुरेश शिरसट आणि राजू छेदीलाल सेठ, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एनटेक्स …
Read More »माणगाव म्हसेवाडीत वृद्धेला लुटून हत्या
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथील एका वृद्ध महिलेचे दागिने ती एकटीच घरात राहत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लुटून तिची घरातील पाण्याच्या टपात तोंड बुडवून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संगीता श्रीरंग सावंत (वय 69) असे मृत महिलेचे नाव आहे. …
Read More »सजग सहभाग हवा
अंटार्क्टिकातील हिमाच्छादित आवरण झपाट्याने कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या नोंदीतून यंदा गेल्या वर्षीपेक्षा काहिसे लवकरच ध्यानात आले असून यापूर्वी कधीही तिथे इतकी टोकाची परिस्थिती आढळलेली नाही असे निरीक्षण ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. तेथील हिम वितळण्याचा मौसम संपण्यास काही आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना विक्रमी बदल नोंदला गेल्याने जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांचा विळखा पृथ्वीला …
Read More »रसायनी स्टेशन सुविधांच्या प्रतीक्षेत
मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी हे औद्योगिक क्षेत्र असून याठिकाणी असणारे रसायनी हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु गेले दोन वर्षांपासून येथील तिकीट घर गायब झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच अन्य सुविधांचीही वानवा असल्याने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. रसायनी परिसर हा औद्योगिक क्षेत्राने नटलेला असून …
Read More »दुकानावर मराठी भाषेतील नामफलकासाठी शिवसेना आग्रही
पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन पनवेल : वार्ताहर मराठी अस्मिता जपण्यासाठी दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांवर मराठी भाषेत नाव असलेच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पनवेल महापालिका …
Read More »सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा शुभेच्छा चिंतनपर कार्यक्रम सोमवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन …
Read More »पिसाळलेल्या श्वानाची दहशत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये एका पिसाळलेल्या श्वानाने दहशत पसरवली आहे. या श्वानाने दोन दिवसांत अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. महापालिकेचे पथक या श्वानाचा शोध घेत आहेत. पनवेल शहरामध्ये सोमवारी लाईन आळी परिसरात तसेच टपाल नाका परिसरातील युनियन हॉटेल येथे अनेक नागरिकांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. तर मंगळवारी (दि. …
Read More »मोहोपाडा तलावाला मद्यपींचा विळखा
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा परिसरातील वासांबे देवी ही ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. तलावाकाठी गावदेवीचे मंदिर आहे. मंदिराजवळील मोकळ्या जागेत तसेच गणपती विसर्जन घाटावर सायंकाळी मद्यप्राशन करणार्या तळीरामांचा वावर दिसून येत असून या ठिकाणी संध्याकाळच्या काळोखाचा फायदा घेत तळ्यावर तळीराम मद्यपान करताना दिसून येत आहेत. यामुळे येथून जाणार्या-येणार्या नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात …
Read More »भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ शिवजन्मोत्सव
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन विक्रांत पाटील शिवजन्मोत्सव प्रभागातील नागरिकांच्या सोबत मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यानुसार यावर्षी खास किल्ले रायगड वरून शिवज्योत आणण्यात आली होती, तसेच साक्षात माता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper