Breaking News

Yearly Archives: 2023

माणगावातील ‘त्या’ गृहसंकुलात 34 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा या गृहसंकुलामध्ये रक्ताचे ठिपके आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी या निवार्‍यामध्ये बिल्डिंग क्र. 2 मधील एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 5) घडली आहे. उतखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा गृहसंकुलातील बिल्डिंग क्र. 2मध्ये गुरुवारी दुपारी …

Read More »

चिरनेर परिसरात कडधान्य पिकांना बहर !

उरण : वार्ताहर सध्या चांगलीच थंडी पडू लागली आहे. या गारेगार वातावरणात उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात कडधान्य पिकांना बहर आला आहे. त्यामुळ येथील शेतकरीवर्ग आनंदी आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांनी दीपावलीनंतर रब्बी हंगामातील कडधान्य लागवडीस सुरुवात केली. त्यामुळे थोडासा विलंब झाल्याने चालू हंगामात कडधान्य पिकांबाबत थोडीशी साशंकता होती, ही …

Read More »

विद्यार्थ्यांनी अनुभवली पोलीस ठाण्यातील कार्यपद्धती

पनवेल : वार्ताहर पोलीस रेजिंग डे सप्ताहादरम्यान याकूब बेग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी त्यांचे स्वागत केले व यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पोलीस खात्यातील वेगवेगळ्या कामकाजा संदर्भात माहिती दिली.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित केल्या त्यांच्या शंकाचे निरासन विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी …

Read More »

जेएनपीएकडून चार ग्रामपंचायतींना मालमत्ता कर

उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना कर मिळाल्याने आता ग्रामपंचायत हद्दीतील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. उरणच्या तत्कालिन जेएनपीटी तथा आत्ताच्या जेएनपीए बंदराकडून स्थानिक ग्रामपंचायतींना येऊ असलेल्या मालमत्ता कराचा प्रश्न काही अंशी सुटला असून यातील 11 पैकी चार ग्रामपंचायतींना मालमत्ता करापोटीच्या धनादेशांचे वाटप जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या …

Read More »

नवी मुंबईत स्वच्छतेचा दर्जा उंचावणार

झोकून काम करण्याचे आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये एक स्तर गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत आणखी उच्चस्तर गाठण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवेत आणि अतिशय जागरूकतेने इतर शहरांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता कामांचा अंदाज घेत आणखी उत्तम दर्जाची स्वच्छता राखायलाच हवी, असे स्पष्ट निर्देश …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयातील क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण

मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) …

Read More »

नवीन पनवेल उड्डाणपूल व एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे कामाला मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांची मंजुरी दिली होती. त्या …

Read More »

हमरापूर प्रीमियर लीगचा थरार

भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उदघाटन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फटकेबाजी केली. दुर्गादेवी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास …

Read More »

मिनी ऑलिम्पिकसाठी रायगड तायक्वांदो संघ रवाना

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त   महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रायगड तायक्वांदो संघाची निवड झाली असून हा संघ स्पर्धेकरिता रवाना झाला. या संघाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या संघात नुपूर पावगे, अपूर्वा देसाई, जयश्री गोसावी, अनुष्का लोखंडे, ऐश्वर्या गोरे, मयुरी खरात, …

Read More »

माणगावमध्ये इमारतीत आढळले रक्ताचे ठिपके

महालक्ष्मी निवारामधील प्रकार ः नागरिक भयभीत, घातपाताची शक्यता, तपास सुरू   माणगांव : प्रतिनीधी माणगाव शहरातील उत्तेखोलवाडीत नव्याने निर्माण झालेल्या महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्समध्ये 3 जानेवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास काहीतरी भयानक प्रकार घडला. या प्रकारामुळे महालक्ष्मी निवासामधील नागरीक भयभीत झाले आहेत. या इमारतीमध्ये जिने आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे पडल्याचे आढळले. …

Read More »