नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतून पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2021 -22 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी अगोदरच जाहीर केली होती. नुकतेच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन …
Read More »Yearly Archives: 2023
नावडे फेज 2मध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने 5 ते 8 जानेवारीदरम्यान आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नावडे फेज 2 येथील सिडको मैदानावर होणार्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …
Read More »ऑडी गाडीमधील हत्येचा उलगडा
पुण्यातून आरोपी ताब्यात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलची कारवाई पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडी ठेवून ते पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून या गुन्ह्यातील दोन …
Read More »उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश; वीज कर्मचार्यांचा संप मागे
मुंबई : प्रतिनिधी महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी विविध मुद्द्यांवर तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी बुधवार (दि. 4)पासून बत्ती गूल झाली होती. राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्याला यश आले असून वीज कर्मचार्यांनी आपला संप मागे घेतला आहे. या संदर्भात …
Read More »भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मंगळवारी (दि. 3) महिला मोर्चाची आढावा बैठक झाली. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्तीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या बैठकीस पनवेलच्या माजी महापौर डॉ. …
Read More »पनवेलमधील गुळसुंदेत स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग
रसायनी ः प्रतिनिधी लहरी हवामानावर मात करण्यासाठी शेतकर्यांकडून वेगवेगळी पिके, उत्पादने घेण्याची गरज आहे, तरच त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. याचाच एक भाग म्हणून पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे शेती संशोधक व प्रगतशिल शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी 50 स्टॉबेरीची झाडे प्रयोग म्हणून लावली होती. त्यात त्यांना यश आले असून साधारण दीड महिन्यात …
Read More »उरण बोकडविरा येथे वृद्ध महिलेची हत्या
उरण : प्रतिनिधी उरण शहराजवळ असलेल्या बोकडविरा येथील वृद्ध विधवा महिलेची हत्या झाली आहे. ललिता ठाकूर (वय 64) असे या महिलेचे नाव असून त्या एकट्याच राहात होत्या. ललिता ठाकूर या बोकडविरा येथील खासगी शाळेत मोलमजुरी तसेच मालकीच्या तीनपैकी दोन खोल्या भाड्याने देऊन मिळणार्या उत्पन्नातून उपजीविका करीत होत्या. मंगळवारी (दि. 3) …
Read More »विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा पनवेलमध्ये निषेध पनवेल ः रामप्रहर वृत्त छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 3) आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करून निषेध केला गेला. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात माजी महापौर डॉ. …
Read More »कडक बंदोबस्तात पोलीस भरती सुरू
अलिबागेत तरुण-तरुणींची गर्दी; पहिल्या दिवशी मैदानी चाचणी अलिबाग ः प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील शिपाई आणि चालक पदाच्या भरतीची प्रक्रिया मंगळवार (दि. 3)पासून सुरू झाली. पहिल्या दिवशी चालकपदासाठी पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. कुठलाही गैरप्रकार किंवा अनुचित प्रथा रोखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. …
Read More »आकुळवाडीजवळ रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी कराडे खुर्द येथील संतोष रामचंद्र दाभणे (वय 45) यांचा रेल्वे अपघातात गंभीर मृत्यू झाला असल्याने कराडे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटाजवळ मौजे आकुळवाडी येथील पेण ते पनवेल रेल्वे टॅकवरील स्टोन नंबर 80/21 ते 80/23 चे दरम्यान पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्या रेल्वेची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper