Breaking News

Yearly Archives: 2023

छत्रपती संभाजी महाराजांप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन

पनवेल ः रामप्रहर वृत्त छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 3) आंदोलन करण्यात आले. या वेळी घोषणाबाजी करून निषेध केला गेला. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश …

Read More »

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (दि. 3) निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. तेथील महापालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून …

Read More »

भाजप महिला मोर्चाची सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी घेतली दत्तक

खोपोली : प्रतिनिधी समाजाचे देणे लागतो, या भावनेतून खोपोली भाजप महिला मोर्चाच्यावतीने प्रकाशनगर भागातील गरीब वस्तीतील अंगणवाडी दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप याद्वारे मदतीचा हात देत आहेत. अलीकडेच नवीन वर्षाचे औचित्य साधत अंगणवाडीतील महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य ठेवण्यासाठी एक कपाट तसेच बसण्यासाठी चटई वाटपाचा कार्यक्रम अश्विनीताई …

Read More »

सुधागडातील प्राचीन लेण्यांकडे प्रशासनासह ‘पुरातत्त्व’चे दुर्लक्ष

उपद्रवींकडून रंगरंगोटीतून विद्रुपीकरण, ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे  ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक …

Read More »

रायगड जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट 2021मध्ये नियुक्त झालेल्या डॉ. कल्याणकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे. डॉ. …

Read More »

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून चोरी

महिलेला मानपाडा पोलिसांकडून अटक 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करणार्‍या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी एकूण 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या …

Read More »

आजपासून रायगडात पोलीस भरती

संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीला मंगळवारपासून (दि. 3) अलिबागेत पोलीस मुख्यालयात सुरुवात होणार आहे. ही भरती प्रक्रिया 22 जानेवारीपर्यंत सुरू राहील. पोलीस शिपाई पदाकरीता 19176 तर चालक पोलीस शिपाई पदांकरीता 647 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भारती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व कोणताही अनुचित पराक्र घडू …

Read More »

मुरुड नगर परिषदेसमोर कोळी समाज ठिय्या आंदोलन करणार

मुरुड :  प्रतिनिधी मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65़ ड 2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. …

Read More »

दगडाने ठेचून महिलेची हत्या

पनवेल : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भिंगारगाव भेर्लेवाडी येथील एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील भिंगारगाव भेर्लेवाडी येथील 45 वर्षीय तारा आनंदा कातकरी या महिलेची अज्ञात व्यक्तीने दगडाच्या साह्याने तिचे हत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात …

Read More »

पनवेलमध्ये उपसरपंच निवडणुकीतही भाजपची बाजी

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 10 पैकी सहा ठिकाणी झेंडा फडकविला आहे. त्याचप्रमाणे सोमवारी (दि. 2) झालेल्या उपसरपंच निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. पदभार स्वीकारलेल्या शिवकर, नेरे व चिंध्रण येथील सरपंच व नवनिर्वाचित उपसरपंच तसेच सदस्यांना भाजपचे …

Read More »