Breaking News

Monthly Archives: August 2024

कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचे स्मरण ठेवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आजची तरुण पिढी स्वतःला मिलेनिअर म्हणवून घेते. या तरुण पिढीला देशाचा विकास करायचा आहे. देशाचा विकास करताना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आणि कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचे विस्मरण होऊ नये, असे सांगून आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या खुणा सतत तेवत ठेवण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात आहे, असे …

Read More »

भाजप युवा मोर्चा पनवेल ग्रामीणच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खाससदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांनी पनवेल ग्रामीण मंडल युवा मोर्चा अंतर्गत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यानुसार ग्रामीण मंडल …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 13वा वर्धापन दिन बुधवारी (दि. 7) उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. याचबरोबर कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी …

Read More »

पनवेलमध्ये नाट्य महोत्सव उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी या महोत्सवाला भेट देत कलाकारांचे कौतुक केले. या वेळी महिला व लहान मुलांनी त्यांचे औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप उत्तर …

Read More »

पनवेलकरांचा नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अजरामर विनोदी नाटक ऑल दि बेस्ट आणि धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आज्जीबाई जोरात ही दोन्ही नाटके हाऊसफुल्ल होती. या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन …

Read More »

स्वदेशी उत्पादने आणि खादीचा जास्तीत जास्त वापर करावा -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर ः रामप्रहर वृत्त फॅशन, उद्योगविश्वात हातमाग व खादी कपड्याला प्रचंड मागणी वाढली आहे. हातमाग कलेतल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन व्हावे आणि यातून नवनवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी आपल्यातील प्रत्येकाने स्वदेशी उत्पादने व खादीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते बुधवारी (दि. …

Read More »

विरोधी पक्ष विषाप्रमाणे काम करतोय -आमदार संजय केळकर

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष हा सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो, मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. विष ज्या प्रमाणे पसरवले जाते त्या प्रमाणे विरोधी पक्ष विषारी काम करत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते, ठाण्याचे आमदार संजय …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड आईसाठी महावृक्षारोपण उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, महिलांना कर्करोग प्रतिबंधक लस, भजन स्वरपुष्प, क्रीडा स्पर्धा, शालेय साहित्य वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. तत्पूर्वी …

Read More »

कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी

प्रत्येक ठिकाणाची एक ओळख असते. त्यावरून ते ठिकाण ओळखले जाते. कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची तलावांचे शहर अशी पूर्वापार ओळख राहिली आहे. याच पनवेलचे एक घट्ट समीकरण बनलंय ते म्हणजे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर. त्यांनी येथील जनतेसाठी स्वतःला वाहून घेतले असून आपल्या उत्तुंग कार्याने पनवेल …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 3) आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला सुमारे 600हून मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला तसेच पनवेलकरांच्या हिताचे उपक्रम …

Read More »