उलवे नोड : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी(दि. 17) रंगले. या वेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »Monthly Archives: January 2025
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे
मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे. बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, तर मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे देण्यात आली आहे. नागपूर व अमरावती चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; गव्हाण येथे तोडक कारवाईसाठीआलेले सिडकाचे पथक माघारी
पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी(दि. 17) सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाई करण्यासाठी आला असता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे सिडकोच्या पथकाला नरमाईची पत्करत माघारी फिरावे लागले.उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस …
Read More »खालापुरातील शिवसेना उबाठा पदाधिकारी भाजपमध्ये
मुंबई : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघामधील आणि खालापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, …
Read More »उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीदरम्यान भव्य नमो चषक 2025
खेळाडू, क्रीडारसिक घेणार लाभ -लोकनेते रामशेठ ठाकूर उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23, 24 व 25 जानेवारीला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे भव्य दिव्य आयोजन उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील …
Read More »शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटे येथे अभिवादन
उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यात 1984 साली झालेल्या गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना 41व्या स्मृतीदिनी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी शुक्रवारी (दि. 17) पागोटे येथे अभिवादन केले.शेतकर्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्यात आला. या लढ्यात 17 जानेवारी 1984 रोजी …
Read More »नवी मुंबई विमानतळावर ‘दिबां’चे विशेष फलक लावू -ना. गणेश नाईक
शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन उरण : प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दि. बा. पाटील यांचे विशेष फलक लावूया, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. ते उरण तालुक्यातील जासई येथे हुतात्म्यांच्या अभिवादनावेळी बोलत होते.महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासईच्या वतीने 1984मधील गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांचा 41वा स्मृतीदिन …
Read More »आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत -पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायगड : रामप्रहर वृत्तभारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.15) येथे केले.भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प
पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ पनवेल : रामप्रहरविधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या आघाडीनुसार पाच वर्षात त्या संख्येत वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने खारघरमधील पांडवकडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महपालिकेचे माजी …
Read More »पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुले, युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. लहान मुला-मुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आले होते. आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाची जणू स्पर्धाच सुरू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper