पनवेल : रामप्रहर वृत्तपीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रो. जोगेंद्र कवाडे यांच्या आदेशाने पनवेल महानगरपालिका …
Read More »Monthly Archives: December 2025
पनवेल महापालिकेत भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयी खाते उघडले आहे. भाजपचे प्रभाग 18 ब मधील उमेदवार नितीन जयराम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विरुद्ध उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत. त्यांच्या विजयी सलामीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलच्या उसर्ली परिसरात विविध विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील उसर्ली परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे सोमवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या …
Read More »पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी मंगळवारी (दि. 30) नियोजित वेळापत्रकानुसार आपले उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल केले. विविध प्रभागांतील भाजप महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रियेनुसार अर्ज सादर केले.पनवेल महापालिका निवडणूक प्रभारी …
Read More »कळंबोलीत राजस्थानी व हरियाणा मूळ रहिवाशांचा स्नेहमेळावा
उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तराजस्थानी सामाजिक विकास संस्था आणि हरियाणा निवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात भव्य सामाजिक-पारिवारिक सोहळा रविवारी उत्साहात झाला. हा कार्यक्रम केवळ औपचारिक आयोजनापुरता मर्यादित न राहता विविध समाजघटकांना एकत्र आणणारा, आपुलकी, एकोपा व …
Read More »पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची अधिकृत घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली.महापालिकेच्या एकूण 78 …
Read More »माणूस कितीही मोठा झाला तरी मातीची आणि संस्कृतीची जाण महत्त्वाची -लोकनेते रामशेठ ठाकूर
गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव रंगला पनवेल : रामप्रहर वृत्तमाणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीत आपण वाढलो, त्या मातीची आणि संस्कृतीची जाण असणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भव्य गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव 2025च्या उद्घाटनावेळी केले.गव्हाण ग्रामपंचायतीसमोरील मैदानात …
Read More »सीकेटी ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांनो आपल्या भागात विमानतळामुळे नोकरीच्या अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. नवनवीन उद्योग आपल्या भागात येत आहेत. म्हणूनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत तुम्ही जीवनात यशस्वी व्हा आणि खूप प्रगती करा, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »शेकाप वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके समर्थकांसह भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसमोर शेकापने शरणागती पत्करली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेकापला अखेरचा सलाम करत देशविकासाची विचारधारा असलेल्या भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्याच अनुषंगाने शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी …
Read More »गोष्ट न संपणारी
आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील सर्वात जास्त महत्वाची गोष्ट, आवडत्या कलाकारावर त्याच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम. राजेश खन्नावर तर समाजातील वरच्या स्तरापासून खालच्या माणसापर्यंत अनेकांनी बेहद्द प्रेम केले.एक वेगळी गोष्ट सांगतो,आजही मी वांद्र्याच्या कार्टर रोडवरुन जातो तेव्हा माझे लक्ष हटकून राजेश खन्नाच्या बहुचर्चित अशा आशीर्वाद बंगल्याकडे जाते आणि आज त्या बंगल्याच्या कोणत्याच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper