Breaking News

पोलादपूरमध्ये उत्स्फूर्त बंद पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

पोलादपूर : प्रतिनिधी

पुलवामामध्ये सीपीआरएफच्या जवानांच्या बसवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी अतिरेक्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 15) पोलादपूर बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात येऊन सर्वपक्षीयांनी शहरात पाकनिषेधाच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. पोलादपूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सकाळी 11.30च्या सुमारास बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यासाठी सर्वपक्षीय रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, नगराध्यक्ष नीलेश सुतार, माजी उपनगराध्यक्ष उमेश पवार, नागेश पवार, भाजपचे परशुराम दरेकर, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, मनसेचे महेश निकम, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे महमद मुजावर, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, युवासेनेचे विनायक दीक्षित, तसेच व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, असंख्य देशप्रेमी नागरिक सहभागी झाले. शहरासह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि महाबळेश्वर महामार्गावरील दुकानदार व टपरीधारकांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करून रॅलीची सांगता करण्यात आली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply