Breaking News

अंजुमन इस्लाम महाविद्यालयात प्लास्टिकमुक्तीसाठी शपथ

मुरूड : प्रतिनिधी

 महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) प्लास्टिकमुक्त भारताची शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे कागदी व कापडी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकमुक्त भारत‘साठी शपथ घेतली. या वेळी विद्यार्थ्यांसाठी कागदी आणि कापडी पिशव्या बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यशाळेस संस्थेचे सहसचिव अब्दुल रहीम कबले आणि माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी भेट दिली. सदरचा उपक्रम भारत प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि प्रदूषणमुक्त गाव आणि शहरे निर्माण करण्यास याचा हातभार लागेल, असा विश्वास या वेळी कल्पना पाटील यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत एक हजार कागदी आणि 500 कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. साजिद शेख आणि डीएलएलई विभागप्रमुख प्रा. सोनाली पवार यांच्यासह तनझील उलडे, तस्कीन महाडकर, उमर कबले, स्वालीहा मुकादम, सुभेदार फातिमा, अन्सारी नौफ, शोकत हमदुले, मोहम्मद मांडलेकर, उजमा उलडे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply