Breaking News

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही

मुंबई ः प्रतिनिधी
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. युजीसीच्या निर्देशांनुसारच सगळे निर्णय घेण्यात येत आहेत. अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पूर्वीच्या वर्षाचा परफॉर्मन्स 50 टक्के गृहीत धरला जाईल आणि सध्याचा परफॉर्मन्स 50 टक्के ग्राह्य धरला जाईल. त्यानुसार ग्रेड दिली जाईल आणि पुढच्या वर्गात पाठवले जाईल, असे सामंत यांनी सांगितले.
ज्याला परफॉर्मन्सवर दिलेले ग्रेड कमी वाटत असतील त्याला पुढच्या वर्गात गेल्यावर ऐच्छिक परीक्षा देत येणार आहे. त्याचे वेळापत्रक विद्यापीठ ठरवेल, तर जे विद्यार्थी ग्रेडिंगमध्ये नापास होतील, त्या विषयाच्या परीक्षा पुढच्या वर्षात प्रवेश देऊन घेतल्या जातील. विद्यापीठ याबाबतचे वेळापत्रक जाहीर करेल, असे ते म्हणाले.एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल, मात्र प्रवेश दिल्यानंतर ज्या विषयाच्या एटीकेटी लागलेल्या आहेत त्या विषयाच्या परीक्षा 120 दिवसांच्या आत घेतल्या जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply