Breaking News

अनलॉकनंतर आदिवासींचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू; जिल्ह्यांतर्गत स्थलांतराला पसंती

माणगाव : प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या सुरूवातीला मार्च 2020 मध्ये राज्याच्या विविध भागातून वाडी वस्तीवर परतलेले आदिवासी बांधव अनलॉकनंतर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरीत होऊ लागले असून. माणगाव तालुक्यातील सुमारे 40टक्के आदिवासींनी स्थलांतर केले आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगार गमावलेले आदिवासी कुटूंब आपापल्या वाडी वस्तीवर परतले होते. गेले नऊ महिने आपल्या मुळ ठिकाणी राहिल्यावर अनलॉकनंतर पुन्हा एकदा ही कुटूंबे रोजगारासाठी स्थलांतरीत होऊ लागली आहेत. प्रतिवर्षी ऑक्टोंबर ते मार्च महिन्यापर्यंत अनेक आदिवासी कुटूंबे रोजगारासाठी राज्याच्या विविध भागात तसेच अगदी कर्नाटक राज्यातही स्थलांतरीत होत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आदिवासी कुटूंबे परराज्यात, परजिल्ह्यात न जाता आपल्याच जिल्ह्यात स्थलांतरीत झाली आहेत. विटकाम, कोळसा खाण, बागांची काळजी घेण्यासाठी तसेच दगड खाणी इत्यादी ठिकाणी संपूर्ण कुटूंबासह माणगाव तालुक्यातील आदिवासी बांधव स्थलांतरीत झाले आहेत. आगाऊ मजूरी घेतली असल्याने तसेच स्थानिक ठिकाणी पुरेसा रोजगार नसल्याने ही कुटूंब स्थलांतरीत होत आहेत. आजवर तालुक्यातून जवळपास 40टक्के कुटूंबांनी स्थलांतर केले असून या वर्षी जिल्हांतर्गत स्थलांतर अधिक प्रमाणात आहे.

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. एकात्मिक विकास प्रकल्पात रोजगार संधी आहेत मात्र त्यासाठी कागदपत्र पूर्तता करण्याकरीता बरीच धावपळ होते. या वर्षी  जिल्ह्यात किंवा शेजारील जिल्ह्यात स्थलांतर झाले आहे.

-भिवा पवार, अध्यक्ष, एकलव्य सामाजिक संघटना.

अनेक आदिवासी कुटूंबांना रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागले आहे अनलॉकनंतर पुन्हा एकदा स्थलांतर सुरू झाले आहे. अनेक आदिवासी कुटूंबे जिल्ह्यातच कोठे ना कोठे स्थलांतरीत होत आहेत. – अ‍ॅड. अमेय भावे, सामाजिक कार्यकर्ते, माणगाव.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply