पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे हितचिंतक किशोर पाटील यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या अनाथ, वंचित आणि आदिवासीं बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविल्या जाणार्या बालग्राम मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू ,वह्या,पेन, चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अनाथ बालकांसाठी 500 किलो तांदुळ, 50 किलो तूरडाळ, टूथ पेस्ट, ब्रश, 30 किलो शेग तेल 100 रजिस्टर, पेन, पेन्सिल्स, कंपास वह्या असे साधारण 25-30 हजार रुपयांचे सामान या वेळी देण्यात आले.
ह्या कार्यक्रमात किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगून यश मिळविण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. या वेळी सुनीता पाटील, नरेंद्र पाटील, मीनाक्षी पाटील, मनीषा पाटील, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनी केले तर आभार जगदीश डंगर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कोंडसकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील विश्वकर्मा, गोलू गुप्ता, राजेश पाटील, रुपेश रसाळ, योगिता डंगर यांनी विशेष मेहनत घेतली.
RamPrahar – The Panvel Daily Paper