आणखी एकाचा मृत्यू

उरण : घनश्याम कडू
तालुक्यात काल अपघातवार ठरला आहे. काल दुपारपर्यंत झालेल्या दोन अपघातात एका आठ वर्षीय चिमुकलीसह वयस्कर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाण पुलावरून मुकेशकुमार सिंह व अर्जुन वैष्णव हे दोघे जण पायी चालत जात असताना भरधाव स्विफ्ट डिझायर (एमएच 46, एडी 0362) गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की मुकेशकुमार सिंह (24) पुलावरून खाली रस्त्यावर चेंडूसारखा पडल्याने त्याच्या डोक्याचा चुरा होत जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी अर्जुन वैष्णव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नवी मुंबईतील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर स्विफ्ट डिझायर जेएनपीटी बंदरात खाजगी टुरिस्टकडून अधिकारी वर्गाला ने-आण करण्यासाठी आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper