पेण ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एर्टिगा कारची टाटा मॅजिक गाडीला धडक बसून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.19) एर्टिगा कारचालक आपल्या ताब्यातील कार नागोठण्याहून वडखळकडे दुपारच्या सुमारास रस्त्याच्या परिस्थतीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने घेऊन जात होता. या वेळी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवरून गाडी जोरात उडून समोरून पोयनाड ते खारढोंबी येथे जात असलेल्या टाटा मॅजिक गाडीस समोरून धडक देऊन अपघात केला. या अपघातात टाटा मॅजिकचा चालक हर्षद पाटील, गाडीत बसलेले सुशील सोनावणे व प्राप्ती सोनावणे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एर्टिगा कारचालकाविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत
RamPrahar – The Panvel Daily Paper