Breaking News

अभिनव युवक मित्र मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गाने त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली.यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दीप लावले व संपूर्ण मंदिर परिसर तेजाने उजळून निघाला. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा केला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply