Breaking News

अर्चना ट्रस्टतर्फे आदिवासी विधवांना वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात डोंगरदर्‍यात वसलेल्या आदिवासींवर मात्र मोलमजुरी नसल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. अशातच ज्या कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष नाही अशा विधवा महिलांवर भीषण परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे या महिलांना मदत म्हणून अर्चना ट्रस्टकडून शुक्रवारी (दि. 22) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी  विधवा व निराधार महिलांना मदत करण्यासाठी अर्चना ट्रस्टच्या विश्वस्त आशाजी सिंघानिया, प्रभाजी पाटोडिया आणि पनवेल विभाग प्रमुख बीना सोंथालिया विनंती केल्यानंतर तत्काळ प्रतिसाद देत अर्चना ट्रस्टच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील आपटा व कर्नाळा विभागातील नऊ आदिवासी वाड्यांत जाऊन तेथील विधवा महिलांना महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, कांदे बटाटे, साखर, डाळ, कडधान्य, साबण, खाद्यतेल यासह सॅनिटायझर आणि मास्कचे किट देण्यात आले.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, अर्चना ट्रस्टचे कार्यकर्ते रत्नाकर घरत, संजय म्हात्रे, निलेश पाटील, तृप्ती गावंड, आपटा येथील युवा कार्यकर्ते संजय टेंबे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उदय गावंड, मोटिवेशनल स्पीकर राजेश रसाळ, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण दोरे, राकेश पाटील आदींचे सहकार्य लाभले. दरम्यान, अर्चना ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थाचालकांचे आभार व्यक्त करून यापुढेही असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply