मुंबई : प्रतिनिधी
आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले. मुंबईने अर्जुनला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना खरेदी केले. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन चांगलाच आनंदात आहे.
लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा खूप मोठा चाहता राहिलोय. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांचे आभार मानतो. मुंबई पलटनमध्ये सहभागी होण्यास मी खूपच उत्सुक आहे आणि ब्लू गोल्ड जर्सी घालण्याची आतुरतेने वाट बघतोय,’ अशी प्रतिक्रिया अर्जुनने दिली आहे.
अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात पाच षटकार लगावत 31 चेंडूंत 77 केल्या, तसेच तीन महत्त्वाचे बळीही मिळवले.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper