अलिबाग : प्रतिनिधी
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आमदार दळवी यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
एका जुन्या प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने आमदार दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. निवडणुकीवरून दोन गटांत हाणामारी आणि शिवीगाळ झाली होती. यात एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अंकुश पाटील, अनिल पाटील, अविनाश म्हात्रे यांना दोन वर्ष कारावास आणि रुपये पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा अलिबाग सत्र न्यायालयाने सुनावली होती.
या शिक्षेविरोधात आमदार दळवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. याबाबत निर्णय देताना उच्च न्यायालयाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदार दळवी समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper