अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग येथील कोविड रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे तेथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णालयात सुविधा पुरवा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली आहे.
अॅड. मोहिते यांनी अलिबागच्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणारे डॉ. विक्रमजीत पडोळे, डॉ. राजीव तांबोळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भाजप तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, चेंढरेचे माजी सरपंच नीलेश महाडिक, युवा नेते आदित्य नाईक आदी सोबत होते.
अलिबागमधील कोविड रुग्णालयात गरम पाणी, जेवण चांगले दिले जात नाही. बाथरूमची चांगली व्यवस्था नाही. तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे अलिबागच्या रुग्णालयात चांगल्या सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे अॅड. मोहिते यांनी सांगितले.
दरम्यान, सुरुवातीला पनवेल परिसरात कोरोना रुग्ण आढळत होते. आता मात्र जिल्ह्यात सर्वत्र प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper